News Flash

स्कूल बसविरोधात आरटीओची कारवाई

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसविरोधात नवी मुंबई आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली

नियमांचे उल्लंघन करणाऱ्या स्कूल बसविरोधात नवी मुंबई आरटीओने कारवाई करण्यास सुरुवात केली असून, ऐरोलीतील एका स्कूल बसवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे नियमाला फाटा देऊन विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांचे धाबे दणाणले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी महाराष्ट्र शासनाने कठोर नियम आखून दिले आहेत. यात वाहनांचे फिटनेस प्रमाणपत्र, वाहन चालविण्याचा परवाना, विमा, सुरक्षात्मक उपाय आदींची पूर्तता करणे या बसचालकांना बंधनकारक करण्यात आले आहे.
मात्र काही बसचालकांकडून आजही हे नियम पाळले जात नाहीत. या पाश्र्वभूमीवर आरटीओने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ही झाडाझडती सुरू केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 25, 2015 4:42 am

Web Title: rto action against the school bus
टॅग : Rto,School Bus
Next Stories
1 किरकोळ बाजारात लसूण २३० रुपये किलो!
2 उद्यानातील वृक्षसंपदा पाण्याअभावी संकटात
3 कचरा घोटाळ्यात सिडकोचे अधिकारी गुंतण्याची शक्यता
Just Now!
X