गणेशमूर्तीच्या विसर्जनासाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी केली जाणार आहे. याकरिता मंडळांनी अनंत चतुर्दशीपूर्वी वाहनांची तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
पाचव्या दिवसापासून पुढे होणाऱ्या विसर्जनात मंडळांच्या मोठय़ा मूर्तीचा समावेश असतो. यावेळी मूर्ती ठेवण्यासाठी तसेच कार्यकर्त्यांसाठी ट्रक, टेम्पो ट्रेलर अशा वाहनांचा वापर होत असतो. परंतु ते वाहन योग्य नसेल तर गंभीर दुर्घटनेची शक्यता नाकरता येत नाही. त्यामुळे विसर्जनासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची आरटीओकडून तपासणी होणार आहे. संबधित मंडळांनी हलक्या व अवजड वाहनांची तपासणी करून योग्यता प्रमाणपत्र घ्यायचे आहे. ही परवानगी नसलेली वाहने विसर्जनासाठी वापरता येणार नाहीत.