News Flash

वाळूमाफिया, सरकारी अधिकाऱ्यांमधील साटेलोटे रोखणार

तहसीलदार दीपक आकडे यांच्या पथकाने छापा टाकून तीन ट्रक आणि वाळू जप्त केली.

खारघरजवळील वाळू उपशावर हद्दीबाहेरील अधिकाऱ्यांची कारवाई

खारघर वसाहतीशेजारी खाडीकिनारी सुरू असलेल्या वाळू उपशावर हद्दीबाहेरच्या मंडळ अधिकाऱ्याने पथकासह बुधवारी रात्री दीडच्या सुमारास छापा टाकून संबंधितांवर कारवाई केली. वास्तुविहार सोसायटीशेजारून एक मार्ग खाडीकिनार पट्टीवर जातो. याच ठिकाणी तहसीलदार दीपक आकडे यांच्या पथकाने छापा टाकून तीन ट्रक आणि वाळू जप्त केली. गेल्या सहा महिन्यांतील हा चौथा छापा आहे. त्यानंतर हे प्रकरण खारघर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले.

रात्री साडेतीन वाजता या प्रकरणाची कागदपत्रे तयार करण्यात आली. आणि सकाळी संबंधित विभागाचे मंडळ अधिकाऱ्यांना या छाप्याची माहिती कळविण्यात आली. तहसीलदार आकडे यांच्या या नवीन छाप्याच्या पद्धतीमुळे वाळूमाफिया आणि त्यांना सरकारी पातळीवरून अंतर्गत मदत करणाऱ्यांना चाप बसला आहे.

जुईकामोठे गावातही अशाच प्रकारे छाप्यानंतर काही ग्रामस्थांनी वाळू उपसा सुरू ठेवल्याचे तहसीलदार आकडे यांना कळाले होते. तहसीलदारांनी याआधी जप्त केलेल्या मुद्देमालातील वाळू जुईकामोठे गावात असल्याने वाळुमाफिया वाळू चोरून याच मुद्देमालात ठेवत होते. त्यामुळे नवीन व जुनी वाळूचा पंचनामा करताना अधिकाऱ्यांची अडचण होत असे.

तहसीलदार आकडे यांनी वाळू उपशाची जागा उद्ध्वस्त केली. आकडे यांच्या पूर्वीही संदीप माने आणि पवन चांडक यांच्यासारखे प्रामाणिक अधिकारी पनवेलच्या महसूल विभागात तहसीलदार पदावर होऊन गेले. आकडे यांनी बेकायदा वाळू उपशाविरोधात मोहीम सुरूच ठेवली. महसूल विभागातील अधिकारी आणि कर्मचारी हे अवैध वाळू उपशाला थारा देणार नसल्याचे आकडे यांनी स्पष्ट केले. खाडीमध्ये विना परवाना बोटी आणि बार्ज चालतात; परंतु त्यांच्या वापरासंदर्भातील कायदेशीर बाजू तपासणारी मोहीम अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. बोटींची कागदपत्रे तपासणी मोहीम नवी मुंबईच्या सागरी सुरक्षा पोलिसांनी, महसूल विभागाने आणि समुद्र किनारपट्टी सुरक्षा विभाग कधी घेईल या प्रतीक्षेत पर्यावरणवादी आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 5, 2016 1:48 am

Web Title: sand mafia politics at panvel
टॅग : Panvel,Sand Mafia
Next Stories
1 क्रिकेटच्या सामन्यांच्या जल्लोषात दहावीच्या विद्यार्थ्यांची ‘परीक्षा’
2 हार्बरवरील रेल्वे स्थानकांत बेकायदा फेरीवाल्यांची गर्दी
3 आरोपी सुरज बात्राचा कारागृहात मृत्यू
Just Now!
X