01 June 2020

News Flash

‘एपीएमसी’त निर्जंतुकीकरण सुरू

नवी मुंबईत एपीएमसी बाजार आवार हा करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे

करोना संसर्ग वाढल्याने अखेर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे (एपीएमसी) आवार बंद ठेवण्यात आले. या ठिकाणी सध्या र्निजतुकीकरण करण्यात येत आहे. याशिवाय आवारातील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी सुरू करण्यात आली आहे. आठवडाभर ११ मे ते १७ मे पर्यंत एपीएमसी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (छायाचित्र : नरेंद्र वास्कर)

नवी मुंबई : करोना संसर्ग वाढल्याने अखेर एपीएमसी बाजार आवार बंद ठेवण्यात आला असून त्या ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. मसाला बाजारात ही मोहीम राबविण्यात आली असून सर्व बाजार आवार निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत. त्याप्रमाणे बाजार आवारातील सर्व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तापसणी सुरू केली आहे.

नवी मुंबईत एपीएमसी बाजार आवार हा करोनाचा हॉटस्पॉट झाला आहे. त्यामुळे बाजार बंदची मागणी सर्व स्तरातून होत होती. अखेर आठवडाभर ११ मे ते १७ मे पर्यंत एपीएमसी बाजार समिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पाचही बाजार आवारातील सर्व इमारती व परिसर, गाळे, कार्यालये, प्रसाधनगृहे, रस्ते, गाळयासमोरील परिसर इत्यादींचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. सोमवारी मसाला बाजारात निर्जंतुकीकरण करण्यात आले, अशी माहिती एपीएमसी प्रशासनाने दिली. तसेच फळ, भाजीपाला आणि धान्य बाजारात सफाई कर्मचारी, सुरक्षारक्षक, एपीएमसी कर्मचारी असे एकूण २५२ जणांची तपासणी करण्यात आली आहे. यामध्ये कोणीही संशियत आढळले नसल्याची माहिती तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी दिली आहे.

टप्य्याटप्प्याने बाजार आवारातील माथाडी कामगार, सुरक्षा कामगार, स्वच्छता कर्मचारी व बाजार समितीचे कर्मचारी तसेच एपीएमसी पोलीस स्टेशनअंतर्गत असणारे पोलीस विभागाचे कर्मचारी यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2020 4:49 am

Web Title: sanitation begins at apmc market zws 70
Next Stories
1 नवी मुंबईकरांचे अलगीकरण शहरातच
2 करोनाला रोखण्यासाठी उच्च अधिकाऱ्यांच्या नेमणुका
3 नवी मुंबई : एका दिवसात ८२ रुग्णांची वाढ; करोनाबाधितांची एकूण संख्या पोहोचली ६७४वर
Just Now!
X