News Flash

सांताक्लॉजने बाजारपेठा फुलल्या

सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करीत आहे

सर्वत्र नाताळाची तयारी सुरू झाली असून प्रत्येक जण आपल्या पद्धतीने हा सण साजरा करण्याचे नियोजन करीत आहे. सांताक्लॉजच्या माध्यमातून चिमुकल्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बाजारात सांताक्लाज आणि चॉकलेटचे केक उपलब्ध झाले आहे. तसेच ख्रिसमस ट्री, स्टार, बेल, मास्क, कॉस्च्युम टोपी आदी वस्तू बाजारात उपलब्ध आहे.

लहान मुलांपासून ते तरुणांपर्यंत सगळयांनाच नाताळ सणाचे आकर्षण असते. आंनदाने नाचून गाऊन साजरा करण्याचा हा सण आहे. केक यातला महत्त्वाचा भाग असतो. त्याचप्रमाणे चॉकलेट म्हटले की लहान मुलांची आठवण येते. त्याचबरोबर नाताळचे महत्त्व असणार सांताक्लॉजचाही केकमध्ये समावेश झालेला आहे. या दिवसात प्रत्येक ठिकाणी आपल्याला सांताक्लाज दिसून येतो
विविध रंगांनी, कलाकृतीने केक तयार करण्यात आले आहेत. यात आपणास सांताचे अनेक रूपे पाहायला मिळतात. नाताळासाठी काही केकची खास व्यवस्था विक्रेत्याकडे करण्यात आली आहे. या वेळेला दुकानदांरानी सांतालाच बोलावले आहे. त्याच्याच हातून केक वाटण्यात येणार आहेत. त्याचबरोबर काही भेटवस्तूही दिली जाणार आहेत. सांताकडून चॉकलेट आणि केक मिळाल्यावर मुलांना आंनद होतो हे लक्षात घेऊन विक्रेत्यांनी आकर्षित करण्याचा नवा फंडा शोधून काढला आहे. सांताच्या कॅप विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. घराच्या रोषणाईस विविध प्रकारच्या रंगीबेरंगी सजावटीच्या माळा, रोषणाई करणारे दिवे, मेरी ख्रिसमस स्टिकरही खरेदी केले जात आहे. तसेच चॉकलेटच्या पदार्थाच्या टिकाऊपणामुळे मोठय़ा प्रमाणावर त्यांना पसंती मिळत आहे. मॉलमध्ये विविध फ्लेवर रंगरूपातील चॉकलेटचे आकर्षण खरेदीदारांना भुरळ पाडत आहे.
विविध आकाराच्या खोक्यामध्ये कागदी किवा कापडी आवरणात चॉकलेट बांधून दिले जात आहेत. मॉलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेले चॉकलेट बॉक्सची किंमत ७०० रुपयांपर्यंत आहे. प्लेन चॉकलेट, अ‍ॅनिमल बटर फ्लाय, व्ही, लव्ह, ट्रेन्गल, स्टार आदी आकारातील चॉकलेट विविध फ्लेव्हरमध्ये उपलब्ध आहेत.

वस्तूंच्या किंमती
सांता कॅप २५ ते ७५ रुपये
सांता क्रिप सेट ५०० ते १५०० रुपये
सांता बेल्स ५ ते २० रुपये
सांता वलून २० ते १०० रुपये
सांता मास्क ५० ते १०० रुपये
सांता ट्री १७५ ते १२०० रुपये
सांता स्टार ५५ ते २५० रपये
सांता ड्रेस २५० ते १५०० रुपये
संता कॅडल २० ते ८० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 17, 2015 2:56 am

Web Title: santa claus markets flourished
Next Stories
1 आंबा.. एप्रिलपर्यंत थांबा!
2 दिघा येथील अरुंद रस्ता जीवघेणा
3 ‘आधी नागरिकांच्या प्रश्नांवर तोडगा काढा..’
Just Now!
X