15 July 2020

News Flash

नवी मुंबईत करोनामुक्तीचा वेग दिलासादायक

८०० जण बरे होऊन घरी; लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक

प्रातिनिधिक फोटो

८०० जण बरे होऊन घरी; लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या अधिक

संतोष जाधव, लोकसत्ता

नवी मुंबई : नवी मुंबईत बाधितांचा आकडा १६५०च्या वर आहे. तरीही मागील काही दिवसांत करोनामुक्त झालेल्यांची संख्या ८०० इतकी झाल्याने दिलासा मिळाला आहे.

वाशी येथील मशिदीत आलेल्या फिलापाईन्सच्या नागरीकाला करोना झाला आणि तोच शहरातला करोनाचा मृत्यू झालेला पहिला रुग्ण ठरला. राज्य आणि देशातील मृत्यू दरापेक्षा नवी मुंबईतील करोनामुळे मृत्यू पावलेल्यांचा दर देशभरात कमी असल्याचा दावा पालिकेने केला आहे. तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत असल्याचे पालिकेने स्पष्ट केले.

रुग्णनामा

* दिवसागणिक ५०च्या वर रुग्ण आढळत आहेत. आजवर एका दिवसात १०५ रुग्ण ही शहरातील सर्वोच्च रुग्णसंख्या राहिली आहे.

* रुग्णांमध्ये करोना लक्षणे नसलेले रुग्ण मोठय़ा प्रमाणात आहेत. तर अतिदक्षता घेण्याची आवश्यकता असलेले रुग्णांचे प्रमाण २० टक्के इतके आहे. हे रुग्ण ५० वयोगटावरील आहेत.

* करोना पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या १७००पर्यंत पोचली आहे.  तर आजवर ५२ जणांचा मृत्यू झाला आहे.

काळजी कुठे?

तुर्भे आणि कोपरखैरणे भागात अद्यापही रहिवाशांनी अधिक काळजीपूर्वक टाळेबंदीचे पालन करण्याची आवश्यकता असल्याचे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात येत आहे. रुग्णवाढीची संख्या ही कोपरखैरणे आणि तुर्भे विभागात सर्वाधिक आहे. करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्येने अर्धशतक ओलांडले असून करोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या कोपरखैरणे व तुर्भे विभागातच अधिक आहे.आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये पालिकेच्या कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.

करोनामुक्त रुग्णांची संख्या वाढत आहेच, पण या  आजाराचा संसर्ग होऊ नये यासाठी टाळेबंदीच्या नियमांचे पालन करणेही आवश्यक आहे.

 -अण्णासाहेब मिसाळ, आयुक्त नवी मुंबई पालिका 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 26, 2020 5:33 am

Web Title: satisfactory coronavirus recovered rate in navi mumbai zws 70
Next Stories
1 नवी मुंबईतही २३ पोलीस कर्मचाऱ्यांना करोना
2 कर्नाटकात प्रवेश न मिळाल्याने मजूर परतले
3 अखेर खाडीपुलावर प्रकाशव्यवस्था
Just Now!
X