X
X

सिडकोमध्ये लालफितीचा कारभार

पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस नवीन पनवेल ही सिडकोची वसाहत आहे.

नवीन पनवेलच्या ज्येष्ठ नागरिकांची तक्रार; भोंगळ कारभाराकडे लक्ष देण्याची मागणी

नवीन पनवेल येथील अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघटनेच्या सदस्यांनी सिडको प्रशासनाचा वेळकाढू कारभाराची पोलखोल केली असून तशी या संदर्भातील तक्रार त्यांनी सिडकोच्या सहव्यवस्थापकांकडे केली आहे.

नोव्हेंबर २०१२ मध्ये गृहमंत्र्यांकडून पनवेल रेल्वेस्थानकाच्या पूर्वबाजूकडे पोलीस चौकीची इमारत मंजूर केल्यानंतरही सिडकोच्या अधिकाऱ्यांनी तांत्रिक अडचणींचा तपशील पुढे करत, ही चौकी उभारली नसल्याने आणि संबंधित चौकीच्या संदर्भातील फाइल सिडकोमधून बेपत्ता झाल्याने नवीन पनवेलच्या या जेष्ठांनी सिडकोच्या अधिकाऱ्यांना स्मरणपत्र पाठवून आपले कर्तव्यचुकारपणा दाखवून दिला आहे. सिडकोचे नव्याने पदभार सांभाळणारे उपाध्यक्ष भूषण गगरानी यांनी या सिडकोच्या भोंगळ कारभाराकडे लक्ष्य देण्याची मागणी या जेष्ठांनी केली आहे.

पनवेल रेल्वे स्थानकाच्या पूर्व बाजूस नवीन पनवेल ही सिडकोची वसाहत आहे. रेल्वे स्थानकाजवळील जमिनीवर तांत्रिक कारभार सिडकोचे नियोजन विभाग व रेल्वे विभाग यांच्यात आहे. रेल्वे स्थानकाच्या परिसरातील वाढते अतिक्रमन आणि वाढत्या चोऱ्यांमुळे येथे पोलीस चौकी असावी, अशी मागणी जेष्ठांनी ५ वर्षांपूर्वी केली होती. गृह विभागाने या मागणीचा विचार करून नोव्हेंबर २०१२ ला या चौकीसाठी जागेची व त्या जागेवर पोलीस चौकी उभारण्याची मागणी सिडकोकडे केली आहे. पोलीस आयुक्त व स्थानिक पोलिसांकडून तसे पत्र २०१३ पासून सिडकोच्या नियोजन विभागाकडे जमा आहे. मात्र वर्षे उलटली तरीही सिडकोच्या नियोजन विभागाने या फाइलवर कोणतीही कार्यवाही केलेली नाही. याबाबतची तक्रार सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालकांकडे केली आहे.

20
  • Tags: senior-citizens,
  • Just Now!
    X