शरद पवार यांचे आवाहन; राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अधिवेशन
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या शिक्षणाबरोबरच आधुनिक पद्धतीचे शिक्षण देण्याची गरज असून पालकांमध्ये शैक्षिणक गुणवत्तेविषयी विश्वास वाढविण्याकरिता शालेय शिक्षकांनी मुलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. तर महाराष्ट्राचे नवीन सृमद्ध पिढी शिक्षकांनीच घडवली पाहिजे असे प्रतिपादन माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रवार्षिक अधिवेशन व राज्यस्तरीय शिक्षण परिषदमध्ये केले. नवी मुंबईच्या ऐरोली येथील पटनी मैदानात शनिवारी हे अधिवेशन पार पडले.
या वेळी पवार म्हणाले की, बदलत्या शिक्षणाबरोबर मुलांची मानसिकतादेखील बदलत असून त्यांच्या मध्ये नव्या शैक्षणिक विचांराची रुजवण करण्याची गरज असल्याचे मत पवार यांनी व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये चांगल्या शिक्षणाबरोबर गुणवत्तेवर भर देणार असल्याचे तावडे यांनी स्पष्ट करत येत्या ३ वर्षांत शिक्षकांसाठीधोरणात्मक निर्णय सरकार घेईल असे सांगितले.

शिक्षक भरतीवरील बंदी उठवली -तावडे
राज्यातील शिक्षकांच्या भरतीवरील बंदी सरकारने उठवली असून लवकरच शिक्षक भरती सुरू करणार असून आंतरजिल्हा बदली व शिक्षकांच्या आरोग्यासाठी असणारी कॅशलेस विमा योजनाची मागणी राज्यात लवकरच लागू होणार असल्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी या वेळी स्पष्ट केले.