ऐरोलीमध्ये मंगलकार्यालय लोकार्पण कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. उद्घघाटनाच्या श्रेयावरून दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला. यामध्ये जमावाने आमदार संदीप नाईक यांच्या कारच्या काचा फोडल्या आहेत.

ऐरोली सेक्टर ५ येथे जानकीबाई कृष्णा मढवी सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना कार्यकर्ते आपसात भिडले. यामध्ये आमदार संदीप नाईक यांच्या गाडीची काच फोडल्याने भर पडली आहे. सध्या एकीकडे शिवसेना कार्यक्रम घेत आहे तर कारवाई करण्यासाठी महापौर जयवंत सुतारसोबत शेकडो कार्यकर्त्यांनी राबाळे पोलीस ठाण्यात गर्दी केली आहे.

ऐरोलीत शिवसेनेचा नगरसेवक असलेल्या वार्डात शुक्रवारी एका कर्याकर्माचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राजन विचारे यांना येण्यास उशीर होत होता. सर्व अन्य मुख्य लोक आल्यानंतर विचारे यांच्यासाठी किती वेळ वाट पहायची यावर कुरबुर सुरू झाली. अखेर वाट पाहून महापौर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होताच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी सुरू केली. या राड्यात अनेक वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे.