19 September 2020

News Flash

पनवेलमध्ये प्राणवायू खाटांचा तुटवडा

कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त ७० खाटा

संग्रहित छायाचित्र

कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त ७० खाटा

पनवेल : पनवेल तालुक्यातही करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून बाधितांची संख्या १८ हजारांवर पोहचली असून ४०१ जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या वाढत असताना शहरातील करोना रुग्णालयात प्राणवायू व कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या खाटांचा तुडवडा असल्याच्या तक्रारी आहेत. पालिका व महसूल प्रशासनाने प्रयत्न करूनही अतिदक्षता विभागातील प्राणवायू खाटांची संख्या वाढू शकली नाही.

पनवेलमध्ये दररोज करोनाबाधितांची संख्या वाढत असून सद्य:स्थितीत ३६९६ खाटा उपलब्ध असून यात कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेल्या फक्त ७० खाटा असून आयसीयू खाटांची संख्या २३६ तर प्राणवायूयुक्त खाटांची संख्या ८४७ आहे. सर्वसाधारण खाटा या २ हजार ६१३ आहेत. वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत अत्यावश््यक असलेली यंत्रणा कमी पडत आहे. दररोज किमान तीन ते चार रुग्णांना कृत्रिम श्वसन यंत्रणा कमी पडत आहे.

पनवेलमध्ये १७६८६ जणांना करोनाची लागण झाली असून सध्या २४०० हून अधिक रुग्ण विविध रुग्णालयांत व घरातून उपचार घेत आहेत. पालिकेने व महसूल प्रशासनाने उभारलेल्या कोविड काळजी केंद्रात फरफट होण्यापेक्षा निम्म्याहून अनेकांनी घरातूनच उपचार घेणे पसंत केले आहे. सध्या पनवेलमधील करोनाबाधित एमजीएम रुग्णालयात २१८, उपजिल्हा रुग्णालयात ११४ तर डीवाय पाटील रुग्णालयात १०८ रुग्ण उपचार घेत आहेत. मात्र येथील खाटांमध्ये प्राणवायू यंत्रांची सुविधा आणि अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसन यंत्रणा असलेली खाटांची संख्या अपुरी पडत आहे.

पालिकेकडून अजून १०० प्राणवायू असलेल्याखाटांचे नियोजन आहे, मात्र खासगी रुग्णालयांकडून त्याला प्रतिसाद मिळालेला नाही.

पनवेलमध्ये प्राणवायू आणि अतिदक्षता विभागातील कृत्रिम श्वसण यंत्रणा असलेल्या खाटांची संख्या वाढविण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत. विविध रुग्णालयांसोबत याबाबत तातडीची बैठका घेऊन बोलणी सुरू आहेत. लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल.

– संजय शिंदे, उपायुक्त, पनवेल पालिका, आरोग्य विभाग

पनवेल तालुक्यातील करोना रुग्णस्थिती

                           ग्रामीण             शहरी

एकूण मृत्यू               ८१                ३२०

विद्यमान रुग्ण         ६४५             १७५१

करोना चाचणी         ४२६८             ४८४७१

बरे रुग्ण                  ३४३२            ११५५१

एकूण रुग्ण             ४१५८            १३६१३

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 10, 2020 1:16 am

Web Title: shortage of oxygen beds in panvel zws 70
Next Stories
1 ‘युलु’ सायकलचे भवितव्य अधांतरी
2 एपीएमसीतील शेतमाल आवक निम्यावर
3 भुरटय़ा चोरांना उधाण
Just Now!
X