19 February 2020

News Flash

अंमलीपदार्थ विरोधात विशेष मोहीम

अंमलीपदार्थ विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली

पंधरा दिवसांत २० जणांना अटक

अंमलीपदार्थ विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून सार्वजनिक ठिकाणी गांजा सेवन व विक्री करणाऱ्यांना २० जणांना १५ दिवसांत अटक करण्यात आली आहे. सोमवारी गांजा विकणाऱ्या एकाला अटक केली आहे.

जुलै महिन्यात १७  जणांना अटक केले होते तर १५ ते ३१ ऑगस्ट दरम्यान १५ गुन्हे दाखल करीत २० आरोपींना अटक करण्यात आली आहे. रेल्वे स्थानक परिसर, बस स्थानक, मॉल, गार्डन, शाळा, कॉलेज या ठिकाणी ही कारवाई करण्यात आली आहे.

सोमवारी रबाळे पोलिसांच्या पथकाने परिमंडळ एक हद्दीत एकवीरा झोपडपटी येथे छापा टाकून विलास देवराम पवार (वय ४७  वर्ष रा. एकवीरा झोपडपट्टी, महापे) याला गांजा विक्री करीत असताना अटक केले. त्याच्याकडे  सहा किलो १५० ग्रॅम गांजा मिळून आला आहे.

First Published on September 4, 2019 2:49 am

Web Title: special campaign against drugs akp 94
Next Stories
1 जुगार अड्डय़ांवर पोलिसांची नजर
2 महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरली!
3 रिक्षांमुळे प्रवासी घटले
Just Now!
X