09 July 2020

News Flash

चाचण्यांच्या व्याप्ती, वेगात वाढ

पनवेल पालिका प्रशासनाचा दावा

पनवेल पालिका प्रशासनाचा दावा

पनवेल : करोना विषाणू संसर्ग चाचणीचा वेग पनवेलमध्ये वाढला आहे. गेल्या ३१ दिवसांत ३३२० रुग्णांच्या चाचण्या पालिकेच्या वतीने करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्ण शोधमोहीम वेगाने होत असल्याचे प्रशासनाने सांगितले. याआधी ६६ दिवसांत २५०० चाचण्या पनवेलकरांच्या करण्यात आल्या आहेत. २२ मार्चपासून ते २८ मे यादरम्यान २५६८ रुग्णांची चाचणी पालिकेने केली होती.

मेट्रोपोलीस प्रयोगशाळा, सिटी बॅंक आणि सिप्ला फाऊंडेशन यांच्या सहकार्यातून साडेचार हजार कोटी रुपयांचा निधी पालिकेला उपलब्ध झाला आहे. त्यामुळे पालिका आयुक्त सुधाकर देशमुख यांनी चाचण्या गतिमान होण्यासाठी भर दिला आहे. नागरिकांमध्ये करोनाची लक्षणे नसताना करोना चाचणीत बाधा झाल्याचे वेळीच समजल्याने रुग्णांना वेळीच उपचार घेता आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले.

याआधी दिवसाला सरासरी ३९ जणांच्या चाचण्या करून त्यांचे अहवाल दिले जात होते. अहवाल प्राप्त होण्यासाठी विलंब लागत होता. मात्र, पालिकेला खासगी प्रयोगशाळेच्या सहकार्याने दिवसाला १०७ रुग्णांचे अहवाल प्राप्त होत आहेत. एखादा रुग्ण सापडल्यानंतर संबंधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची आरोग्य चौकशी त्यांना घरात प्रतिबंध करणे, संबंधित रुग्ण राहत असलेला परिसराचे निर्जंतुकीकरण करणे, इमारतीचा काही भाग बंद करणे अशा उपाययोजना पालिकेने तातडीने हाती घेतल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 30, 2020 3:30 am

Web Title: speed of coronavirus test increased in panvel zws 70
Next Stories
1 आरोग्य विभागाला प्राणवायू
2 नवी मुंबईची भरारी
3 करोना ‘पॉझिटिव्ह’ अधिकाऱ्याची अविरत रुग्णसेवा
Just Now!
X