20 January 2021

News Flash

नवी मुंबईकर गणरंगी रंगले

वाशी बाजार अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील ग्राहकांची गर्दी झाली होती. 

(संग्रहित छायाचित्र)

गणेशोत्सवानिमित्त वाशी बाजारात खरेदीला उधाण

वाशी घाऊक बाजारात गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बुधवारी ग्राहकांची झुंबड उडाली होती. पूजा, तसेच सजावटीच्या साहित्याची खरेदी करण्यात आली.

वाशी बाजार अर्थात मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत मुंबई, ठाणे, कल्याण आणि डोंबिवलीतील ग्राहकांची गर्दी झाली होती.  विविध आकर्षक साहित्याला मोठी मागणी होती. खरेदीसाठीचा शेवटचा दिवस म्हणून ग्राहकांनी दुकानांवर गर्दी केली होती. भाविकांनी पर्यावरणपूरक सजावटीला प्राधान्य दिले आहे. थर्माकोल मखरला बंदी असल्याने सुटसुटीत आणि रंगीबेरंगी कापडी मखरांसाठी मागणी वाढल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

विविधरंगी फुलांच्या माळा हे ग्राहकांचे आकर्षण होते. एका लोखंडी आधार, स्पंज आणि यावर कापडी फुले आणि सजावटीचीस मखर खेरदीला अधिक पसंती मिळाली. मखर अधिक आकर्षक करण्यासाठी पॉलिस्टरच्या हिरवेगार गालिच्यांनाही मागणी असल्याचे सांगण्यात आले. मखरांची किंमत दीड ते चार हजारांपर्यंत आहे.

भारतीय बनावटीच्या कापडी फुलांच्या जाळी असलेल्या नव्या साहित्याचीही खरेदी झाली. लाकडाच्या उघड-बंद होणाऱ्या स्टँडला कापडी फुलांची आरास करण्यात आली आहे. त्यांची किंमत ८०० ते दीड हजार रुपयांपर्यंत आहे. तसेच कापडी फुलांच्या माळा २०० रुपये ते ५०० रुपयांवर उपलब्ध आहेत.

वाशी बाजारात पूजेच्या साहित्याला ग्राहकांची मोठी मागणी होती. गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापना करण्यासाठी लागणारे साहित्य, धूप, कापूर, जानवे, सुगंधी अगरबत्ती, बाशिंग, विविध प्रकारचे मुकुट, सुगंधी अत्तर व मध इत्यादी साहित्य खरेदीकरिता ग्राहकांचे गर्दी झाली.

नारळांना मागणी

गणेशपूजनासाठी नारळ आवश्यक असल्याने घाऊक बाजारात त्याची मागणी वाढली होती. नारळाचे भाव कमी झाले आहेत. याआधी नारळ १८ते ३० रुपयांना विकले जात होते. बुधवारी १५ ते २७ रुपयांपर्यंत नारळ उपलब्ध होते.

चिनी झगमगाट

गेल्या वर्षी बाजारात भारतीय बनावटीचे विद्युत रोषणाईसाठीचे दिवे उपलब्ध होते. मात्र यंदा चिनी बनावटीच्या दिव्यांची विक्री केली जात आहेत. लेझर मशीन, रोप लाइट, एलईडी माळ, जेली माळ, ड्रॉप लाइट, झोतदिवे, डमरू माळ, चेरी लाइट अशा विविध प्रकारच्या माळा उपलब्ध आहेत. यात चिनी माळ ६० ते ८०० रुपयांत उपलब्ध आहेत. तर भारतीय माळा ५०० ते दोन हजार रुपयांत उपलब्ध आहेत.

गणपतीचे पूजन गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून संध्याकाळी ६.४२ पर्यंत करता येईल, अशी माहिती पंचांगकर्ते, खगोलअभ्यासक दा. कृ. सोमण यांनी दिली आहे.

गुरुवारी सकाळी ११.२१ पासून दुपारी १.४८ पर्यंत मध्यान्हकाळ आहे. गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून सूर्यास्तापर्यंत म्हणजे सायंकाळी ६.४२ पर्यंत गणेशपूजन करण्यास हरकत नाही, असे सोमण यांनी सांगितले. ज्येष्ठा नक्षत्रात ज्येष्ठागौरींचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रात त्यांचे विसर्जन केले जाते. यावर्षी शनिवार, १५ सप्टेंबर रोजी संपूर्ण दिवसभर अनुराधा नक्षत्र आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण दिवस कधीही गौरी आणाव्यात, असे त्यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 13, 2018 4:03 am

Web Title: spread over shopping in the vashi market for ganeshotsav
Next Stories
1 पटनी मार्गावरील खड्डय़ांचे विघ्न कायम
2 उड्डाणपुलांचे सुशोभीकरण
3 १७६ कोटींचे प्रस्ताव चर्चेविना मंजूर
Just Now!
X