News Flash

चालकाच्या चुकीमुळे एसटी बस अपघात

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल येथे झालेला अपघात हा कंटेनर चालकाच्या नव्हे तर एसटी बसचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

पनवेल : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर पनवेल येथे झालेला अपघात हा कंटेनर चालकाच्या नव्हे तर एसटी बसचालकाच्या चुकीमुळे झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी एसटी बसचालक जगन्नाथ किसन राऊत यांना अटक केली आहे.

बुधवारी मध्यरात्री एसटी बसला झालेल्या गंभीर अपघातामध्ये एकाचा मृत्यू तर १३ जण जखमी झाले होते. एसटी बसचालकाने पोलिसांना अपघातानंतर दिलेल्या तक्रारीत अनोळखी कंटेनरने ठोकर दिल्याने अपघात घडल्याचे सांगितले होते.

पोलिसांनी गुरुवारी सकाळपर्यंत सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली, मात्र काही ठोस हाती लागले नाही. त्यामुळे पोलिसांनी जखमी प्रवासी आणि वाहकाकडे चौकशी केली. त्यात कंटेनरला भरधाव ओव्हरटेक करत असताना बसने कंटेनरला मागून धडक दिल्याची माहिती समोर आली. चालक राऊत यांची वरिष्ठ पोलीस निरिक्षक दौंडकर यांच्यासमोर उलटतपासणी केल्यानंतर त्यांनी चूक कबूल केली आहे. या अपघातामधील तीन जण अजून कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2020 2:57 am

Web Title: st accident due to drivers mistak dd70
Next Stories
1 कोविड रुग्णालयाच्या केवळ गप्पाच!
2 फडके नाटय़गृहाची भाडेकपात लांबणीवर
3 अत्यवस्थ रुग्णांच्या संख्येत वाढ
Just Now!
X