खासगी शौचालयातील कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, महिला कर्मचाऱ्यांच्या शौचालयातील दरुगधीमुळे होणारा संसर्ग, विश्रामगृहातील अस्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याची मागणी, जेष्ठ नागरिकांच्या पास योजनेत सव्‍‌र्हर बिघाडामुळे मारावे लागणारे खेटे, आगारालगत होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक आणि स्थानक परिसरातील अस्वच्छता अशा सर्वच प्रकारच्या समस्या पनवेल बस आगारात आहेत.

BMC, 103 aapla dawakhana sunstroke, cold room for Sunstroke, Sets Up 2 Bed Reserves sunstroke, 14 hospitals sunstroke, bmc prepares for sunstroke, mumbai municioal corporation, mumbai news, sunstroke news, balasaheb thackeray aapla dawakhana, marathi news,
उष्माघाताचा सामना करण्यासाठी आपला दवाखानाही सज्ज, १०३ दवाखान्यांमध्ये वातानुकूलनबरोबरच कुलरची व्यवस्था
thane traffic
कल्याण: पत्रीपुलावर दोन तासांपासून वाहनांच्या रांगा
navi mumbai, nerul, save Kandalvan protest, Cricket umpires, association, activate, environment, marathi news,
कांदळवन वाचवण्यासाठी क्रिकेट पंच संघटनाही सक्रिय, नेरुळच्या चाणक्य तलाव परिसरात आंदोलन
Race for immersion on Rangpanchami in the five rahadis of the Peshwa era
नाशिकमध्ये रहाडींमध्ये डुंबण्याची चढाओढ यासाठी…

बस आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठय़ा नाल्यामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे व इतर दरुगधीमुळे येथे प्रवेश करातानाच नाक मुठीत धरावे लागते. पनवेल पालिकेकडून मिळालेल्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे येथील शौचालयातून निघणारी दरुगधी प्रवाशांना सहन करावी लागते. कर्मचारी व प्रवासी आगारातच झाडाचा व कुंपणाचा आडोसा घेऊनच लघुशंका उघडय़ावर आटपतात.

  • दररोज सुटणाऱ्या, येणाऱ्या बसफेऱ्या  –  १३००
  •  आगाराचे उत्पन्न – सात लाख रुपये

 

कर्मचाऱ्यांचे विश्रांती कक्षही दुर्लक्षित

गर्दीच्या काळात मुंबई सेन्ट्रलप्रमाणेच परळ आगारातूनही एसटी पकडण्यासाठी मोठी गर्दी असते. अशा आगारात प्रवेश केल्यानंतर चांगली स्वच्छता आढळते. प्रवाशांना बसण्यासाठी आसनव्यवस्थाही चांगलीच. मात्र या आगारात पुरुष प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची अवस्था फारच बिकट. पुरुष प्रसाधनगृहाची अवस्था पाहून महिला प्रसाधनगृहाबाबत न बोलणेच बरे. याच आगारात ज्येष्ठ नागरिक असलेले सुरेश शिर्के साताऱ्याला जाण्यासाठी बसची प्रतीक्षा करत होते. त्यांना एसटी गाडय़ांची अवस्था व प्रवासी सुविधांबद्दल विचारले असता, एसटीची लाल परी व निमआराम गाडीच्या देखभाल-दुरुस्तीकडे एसटी महामंडळाने दुर्लक्षच केल्याची खंत व्यक्त केली. त्यातच प्रवाशांसाठी असलेल्या प्रसाधनगृहाची दुर्दशा ही परळ आगारातच काय आणखी काही आगारातही असल्याचे सांगितले. शिर्के यांच्याशी बातचीत केल्यानंतर आगारातील इमारतीत असलेल्या चालक-वाहकांच्या रेस्ट रूमची पाहणी केली. त्या वेळी मुंबई सेन्ट्रल आणि कुर्ला नेहरू नगर आगारातील विश्रांती कक्षाकडेच दुर्लक्ष का, असा पहिला प्रश्न उपस्थित झाला. स्वच्छता, नीटनेटकेपणा, कर्मचाऱ्यांना कपडे व अन्य साहित्य ठेवण्यासाठी असलेली लॉकर सिस्टम परळ आगारातील रेस्ट रूममध्ये दिसली. मात्र नेहमीप्रमाणे प्रसाधनगृहे अस्वच्छ असल्याचे आढळले. या इमारतीच्या पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर खासगी कंपन्यांची कार्यालये. तर वरच्या मजल्यावर विश्रांती कक्ष आहे. या कक्षापर्यंत जाताना धूळमाती आणि कचऱ्यातूनच वाट काढावी लागते.

  • दररोज सुटणाऱ्या, येणाऱ्या बसफेऱ्या – ३५२
  •  आगाराचे उत्पन्न- २० लाख ७४ हजार रुपये

वसईतील एसटी आगार समस्यांच्या विळख्यात

वसई पूर्वेतील भागात एसटी आगार आहे. या आगारातून विविध ठिकाणी ये-जा करणाऱ्या एसटी बस सोडल्या जात आहे.  गेल्या अनेक वर्षांपासून या आगाराची दुरवस्था झाली आहे. पिण्याचे पाणी नाही, वीज नसणे, विद्युत उपकरणे नादुरुस्त, इंटरनेट सेवा नसणे अशा अनेक समस्या भेडसावत आहेत. एसटी आगाराच्या बस खिळखिळय़ा झाल्या आहेत. आगारात कचऱ्याचे साम्राज्य असून स्वच्छता केली जात नाही. अनेकदा बाहेरील वाहनांची या आगारात पार्किंग केली जात आहे.

पावसाळय़ात तळे

नालासोपारा पश्चिमेतील भागात राज्य परिवहन मंडळाचे एसटी आगार आहे. या आगारात दरवर्षी पावसाळय़ात पावसाचे पाणी साचते. पाणी जाण्यासाठी कोणताही मार्ग नसल्याने पाण्याचा निचरा होत नसून प्रवाशांना या पाण्यातून मार्ग काढतच एसटी बस गाठावी लागते. या आगारातून एसटी महामंडळाच्या वतीने विविध ठिकाणी जाणाऱ्या स्थानिक आणि लांब पल्ल्याच्या गाडय़ा सोडल्या जातात. मात्र तरीही या आगाराकडे दुर्लक्ष केले जाते. आगारात घाणीचे साम्राज्य असून प्रवाशांना नेहमीच दरुगधीचा सामना करावा लागतो. या आगारात शेकडो दुचाकी पार्क केल्या जात असल्याने एसटी बसना मोठा अडथळा निर्माण होतो. आगार व्यवस्थापनाने सध्या बेकायदा पार्किंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.

 

पनवेलमध्ये सुविधा ‘फेल’

खासगी शौचालयातील कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन, महिला कर्मचाऱ्यांच्या शौचालयातील दरुगधीमुळे होणारा संसर्ग, विश्रामगृहातील अस्वच्छता, पिण्याच्या शुद्ध पाण्याची मागणी, जेष्ठ नागरिकांच्या पास योजनेत सव्‍‌र्हर बिघाडामुळे मारावे लागणारे खेटे, आगारालगत होणारी बेकायदा प्रवासी वाहतूक आणि स्थानक परिसरातील अस्वच्छता अशा सर्वच प्रकारच्या समस्या पनवेल बस आगारात आहेत.

बस आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठय़ा नाल्यामध्ये साचलेल्या कचऱ्यामुळे व इतर दरुगधीमुळे येथे प्रवेश करातानाच नाक मुठीत धरावे लागते. पनवेल पालिकेकडून मिळालेल्या अपुऱ्या पाणीपुरवठय़ामुळे येथील शौचालयातून निघणारी दरुगधी प्रवाशांना सहन करावी लागते. कर्मचारी व प्रवासी आगारातच झाडाचा व कुंपणाचा आडोसा घेऊनच लघुशंका उघडय़ावर आटपतात.

  •  दररोज सुटणाऱ्या, येणाऱ्या बसफेऱ्या  –  १३००
  • आगाराचे उत्पन्न – सात लाख रुपये

 

कल्याण, भिवंडीत ‘दुर्दशावतार’

कल्याण आणि भिवंडी शहरातील मध्यवर्ती बस स्थानकातून राज्यात विविध ठिकाणी जाण्यासाठी बसगाडय़ा सुटतात. या दोन्ही बस स्थानकांतून हजारो प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र, या दोन्ही स्थानकांत मोठी दुरवस्था पाहायला मिळत आहे. या दोन्ही बस स्थानकांची स्वच्छतागृहे ही अतिशय बकाल झालेली आहेत. तर स्थानकांच्या इमारतींनाही अनेक ठिकाणी तडे गेलेले पाहायला मिळतात. तसेच स्थानकाच्या आतमधल्या बाजूस असलेली भूमिगत गटारेही उघडी आहेत. या उघडय़ा गटारांमधून मोठय़ा प्रमाणात दरुगधी पसरत असून या उघडय़ा गटारांमध्ये पडून अपघात होण्याची शक्यता प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. तसेच कल्याण बस स्थानकातून कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन आणि नवी मुंबई महापालिका परिवहनच्या बसगडय़ाही सुटतात. या बस गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्याही मोठी आहे. मात्र, या बस गाडय़ांनी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना उभे राहण्यासाठी बस थांबे नाहीत. त्यामुळे हे प्रवासी बस येताच ती पकडण्यासाठी धावत सुटतात. वेगाने येणाऱ्या बस गाडय़ा आणि त्यामागे धावत सुटणारे प्रवासी यामुळे कल्याण बस स्थानकात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

संकलन – सुशांत मोरे, आशिष धनगर, संतोष जाधव, संतोष सावंत