News Flash

उरणमध्ये एसटी संप यशस्वी

प्रवाशांना खासगी वाहने व एनएमएमटीच्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागले.

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) या संघटनेने गुरुवारी पहाटेपासून आपल्या मागण्यांसाठी संप सुरू करीत एसटी गाडय़ा बंद केल्याने प्रवाशांना खासगी वाहनांची वाट धरावी लागली. उरण एसटी आगारातील संपात येथील सर्वच कर्मचारी सहभागी झाले होते. या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

एसटी कामगारांच्या वेतन करारानुसार कामगारांना २५ टक्के वेतनवाढ मिळावी, वाहक चालकांची डय़ुटी अलोकेशन टी-९ रोटेशन नुसार करावे, रजेसाठी संगणकीकृत व्यवस्था लागू करावी, यांत्रिक कामगारांना ग्रेडेशनचा लाभ मिळावा, महिला कर्मचाऱ्यांना कायद्यानुसार सोयी सुविधा देण्यात याव्यात, अनुकंपा तत्त्वावरील नोकरभरती प्राधान्याने करावी, विनंती बदल्या करण्यात याव्यात अशा मागण्यांसाठी परिवहन विभाग व महाराष्ट्र एसटी वर्कर्स संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती. या बैठकीत कामगारांच्या मागण्या मान्य न झाल्याने हा संप पुकारण्यात आल्याची माहिती इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत यांनी दिली. यात उरण आगारातील सर्व कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी संपात सहभागी झाले होते. या वेळी एका कर्मचाऱ्याने वाहन चालविण्याचा प्रयत्न केला असता अन्य कर्मचाऱ्यांनी त्याला रोखले. दुपारी बारा वाजेपर्यंत हा संप सुरू होता. या संपामुळे प्रवाशांना खासगी वाहने व एनएमएमटीच्या बस सेवेवर अवलंबून राहावे लागले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 18, 2015 3:05 am

Web Title: st strike successful in uran
टॅग : Uran
Next Stories
1 सागरी सेतूबाधित शेतकऱ्यांना साडेबावीस टक्के भूखंड
2 अंधांसाठी बुद्धिबळ स्पर्धा
3 रेल्वे रूळ ओलांडणाऱ्यांचा ‘सत्कार’
Just Now!
X