• नवी मुंबई पालिका विद्यार्थ्यांच्या खात्यात १५ दिवसांत ‘नेट पॅक’चे पैसे

  • प्रतिविद्यार्थी एक हजार रुपये देण्याचा निर्णय

नवी मुंबई : मोबाइल नसणे किंवा ‘नेट पॅक’साठी पैसे नसल्याने गेल्या वर्षी महापालिकेच्या शाळांतील ४५ टक्के विद्यार्थी ऑनलाइन तासाला बसू शकले नाहीत. यामुळे महापालिका प्रशासनाने सर्वच विद्यार्थ्यांसाठी ‘नेटपॅक’ योजना आखली असून प्रतिविद्यार्थी एक हजार रुपये १५ दिवसांत बँक खात्यात जमा होणार आहेत.

करोनामुळे याही वर्षी महापालिकेच्या शाळा बंद ठेवण्यात आल्या असून ऑनलाइन शिक्षण मंगळवारपासून सुरू झाले आहे. पालिकेच्या ५४ प्राथमिक व २० माध्यमिक शाळा असून सुमारे ४० हजार विद्यार्थी आहेत. शाळांचा दर्जा चांगला असल्याने नवी मुंबई महापालिकेच्या शाळेत विद्यार्थी पटसंख्याही मोठी आहे. मात्र गेल्यावर्षीपासून करोनामुळे शाळाच बंद आहेत. महापालिका शाळेत शिकणारे विद्यार्थी हे गरीब कुटुंबातील असल्याने बहुतांश विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाइल नाही. होण्याची वाट पाहत आहेत.  पनवेल महापालिकेने करोना संकट काळात यशस्वी झुंज दिली असली तरी या काळात विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्याचे प्रयत्न संथगतीने होताना दिसत आहेत. शिक्षण या महत्त्वाच्या मुद्द्यावर पालिकेचे धोरण लंगडेच असल्याचे दिसत आहे. पालिकेच्या १० शाळा तर काहींच्या पालकांकडे मोबाइल आहे मात्र त्यांना रोजगारासाठी घराबाहेर राहावे लागत असल्याने मुलांना मोबाइलचा वापर करता येत नाही. त्याचप्रमाणे मोबाइलसाठी नेटपॅकसाठी तेवढी रक्कम भरण्याची अनेक पालकांची ऐपत नाही. त्यामुळे गेल्या वर्षी महापालिकेच्या ऑनलाइन तासाला फक्त ५५ टक्के विद्यार्थ्यांनीच हजेरी लावल्याचे पालिकेच्या सर्वेक्षणात समोर आले आहे. ४५ टक्के विद्यार्थ्यांना यात सहभागी होता न आल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे.

हे टाळता यावे यासाठी महापालिका प्रशासनाने यावर्षी या विद्यार्थ्यांची गैरसोय दूर करण्याकरता ‘नेट पॅक’ योजना आणली आहे. यात दर महिन्याला नेटसाठी लागणारी रक्कम विद्यार्थ्यांना दिली तर ऑनलाइन तासाला विद्यार्थ्यांची हजेरी वाढेल अशी पालिकेची अपेक्षा आहे. त्यामुळे प्रतिविद्यार्थी महिन्याला एक हजार रुपये देण्याचा प्रशासनाने निर्णय घेतला आहे. मंगळवारपासून ऑनलाइन वर्ग सुरू झाले आहेत. आणि पुढील १५ दिवसांत ही रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार असल्याचे पालिका आयुक्तांनी सांगितले. पहिल्या सत्रासाठी हे नियोजन करण्यात आले असून पुढील काळासाठी त्यानतंर निर्णय घेण्यात येणार आहे.

महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक आहे. विद्यार्थी  शिक्षणापासून वंचित राहू नयेत यासाठी महापालिका प्रशासनाने यावर्षी ‘नेटपॅक’ योजना आणली आहे. पुढील काही दिवसांत या योजनेचे पैसे  विद्यार्थी व पालकांच्या एकत्रित असलेल्या ‘डीबीटी’ खात्यात जमा होणार आहेत. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका