२०० नव्या पथदिव्यांचे काम रखडले; वाहनांचा वेग वाढल्याने अपघातांचा धोका

नवी मुंबई वाशी खाडीपुलाच्या दोन्ही मार्गिकेवरील चार किलोमीटर अंतराच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असले तरी पथदिव्यांचे काम संथगतीने सुरू असल्याने खाडीपुलावरून वाहनचालाकांना रात्रीच्या वेळेत अंधारातून मार्ग काढावा लागत आहे. गेले अनेक दिवस हा खाडीपुलाचा मार्ग अंधारात आहे. मुंबई आणि पुण्याच्या दिशेने मोठय़ा प्रमाणावर वाहने या मार्गावरून ये-जा करीत असतात. तरीही खाडीपुलावर छोटय़ा वाहनांसह दुचाकींही असतात. रात्रीच्या वेळी अंधारात अनेकदा वाहनचालकांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. यात अनेक वाहनचालाकांनी अपघाताची भीती व्यक्त केली आहे.

पुलावर रात्रीच्या वेळी पथदिव्यांअभावी अडचणींचा सामना करावा लागत आहे. खाडीपुल पार करताना अनेकदा वाहनचालक चकततात. पुणे आणि मुंभईकडील मार्गिकेवरील दिवे सध्या बंद आहेत. त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे.

नव्या वाशी खाडी पुलावरील पथदिव्यांचा लपंडाव सुरूच असतो. यात वाहनचालकांना समोरील वाहनांचा लवकर अंदाज येत नाही. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने रस्त्याच्या डांबरीकरणाबरोबरच वाशी खाडी पुलावरील २०० नवे पथदिवे लावणार आहे. पुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी असे दोन ‘हायमास्ट’ लावले जाणार आहेत.तसेच वीजेच्या लंपंडावांमुळे पुल अंधारात राहू नये म्हणून जनरेटरचीही व्यवस्था करण्यात येणार आहे.त्यामुळेवाशी खाडीपुलावरील पथदिव्यांचा लपंडावही नव्या वर्षांत बंद होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. परंतू रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे, मात्र पथदिव्यांचे काम मात्र अजून थंडोबाच आहे.३१ डिसेंबर रोजी सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्ष स्वागतासाठी हजारो नागरीक मुंबई शेजारील ठिकाणी जातात.परंतुत्यांना पुरावर अंधाराचा सामना करावा लागणार आहे.

विद्युत विभागाच्या वतीने वाशी खाडीपुलावरील पथदिव्यांबाबतचे काम सुरु करण्यात आले आहे. २०० पथदिवे बदलले जाणार असून पुलाच्या सुरवातीला व शेवटी २ हायमास्ट लावण्यात येणार आहे.

-एस. एस. जगताप, कार्यकारी अभियंता, रस्ते विकास महामंडळ