देशात सर्वत्र मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक यांच्या हस्ते ध्वजारोहन केले जात असताना नेरुळ येथील एका शाळेत यंदा दहावी च्या परिक्षेत पहिला कं्रमाक पटकवणाऱ्या मुलीच्या पाल्यांना हा मान देण्यात आला. त्यामुळे यंदा अव्वल क्रमांक मिळालेल्या प्रियंका नांगरे यांचे वडील भगवान व आई रंजना यांचा ऊर भरुन आला. आपल्या मुलीचा या आई वडिलांना सार्थ अभिमान वाटला.
नेरुळ मधील एन आर बी एज्युकेशन सोशियल अ‍ॅण्ड कल्चरल ट्रस्टचे माध्यमिक उच्च माध्यमिक तसेच महाविद्यालय आहे. संस्थेचे अध्यक्ष नामदेव भगत यांच्या संकल्पनेतून पाच वर्षांपासून एक नवीन संकल्पना अंमलात आणली गेली आहे. शाळेतील प्रजास्तातक व स्वतंत्र दिनी केवळ समाजातील प्रतिष्ठीत नांमांकित लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते ध्वजारोहन न करता शाळेत त्या वर्षी दहावीत पहिल्या आलेल्या विद्यार्थ्यांच्या पाल्याच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊ लागले आहे. यंदाचा मान हा या शाळेतील मराठी माध्यमांच्या ८८.८ टक्के मिळविलेल्या प्रियांका भगवान नांगरे व त्याची पत्नी रंजना यांना मिळाला आहे.
२०११ मध्ये मराठी माध्यमांच्या भावेश अंकुश कोंडाळकर यांच्या पालकांना मिळला तर २०१२ मध्ये मराठी माध्यमांच्या ऋषिकेशन नामदेव शिर्के. २०१३ मध्ये इंग्रजी माध्यमांच्या व्यंकटेशन सुब्रमण्यम यादव. २०१४ मध्ये मराठी माध्यमांच्या अभिषेक प्रसाद तेजनारायण. २०१५ मध्ये मराठी माध्यमांच्या संदेश नामदेव शिर्के यांच्या पालकांना स्वतंत्र दिनी ध्वजरोहण करण्याचा मान मिळाला.

Ragging on two postgraduate students at BJ Medical College in Pune print news
धक्कादायक! पुण्यातील बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तरच्या दोन विद्यार्थिनींवर ‘रॅगिंग’
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष
Nursing student commits suicide in hostel
नागपूर : धक्कादायक! नर्सिंगच्या विद्यार्थिनीची वसतिगृहातच आत्महत्या
mumbai, maharashtra Government, Wilson Gymkhana Plot, Lease, jain international organisation, 30 years, marine drive, wilson college, students,
विल्सन जिमखान्याचा भूखंड जैन संघटनेकडे