19 October 2019

News Flash

शैक्षणिक वर्ष संपताना विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार

शैक्षणिक वर्ष संपता संपता नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

स्थायी समितीत अखेर प्रस्तावाला मंजुरी

नवी मुंबई : कायदेशीर प्रक्रियेत अडकलेल्या गणवेश खरेदी प्रस्तावाला विरोध होऊनही मंगळवारी झालेल्या स्थायी समितीत मंजुर करून घेतला. त्यामुळे शैक्षणिक वर्ष संपता संपता नवी मुंबई महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षांत थेट लाभार्थी योजनेमुळे बहुतांश विद्यार्थी गणवेशापासून वांचित होते. यावर्षी निविदा प्रक्रियेत अडकल्याने वर्षभर विद्यार्थ्यांना जुन्याच गणवेशावर काढावे लागले.

शालेय गणेवेश खरेदी प्रस्ताव स्थायी समितीत बोगस कागदपत्रे सादर करून निविदा काढली गेली असल्याच्या संशयावरून दोनदा स्थगित करण्यात आला होता. १३ डिसेंबर रोजीच्या स्थायी समितीत  ८ कोटी ११ लाख ७० हजार ७८३ रुपयांचा हा प्रस्ताव मांडण्यात आला होता.

आज झालेल्या स्थायी समितीच्या निविदाकराची निवड करताना प्रक्रियेत सावळा गोधळ करून ही प्रक्रिया केली असल्याचा आरोप सदस्यांनी केला. गणेवेश खरेदीचा ठेका आसामची प्रागज्योतिका आसाम एमपीरिअम आसाम गव्हर्नमेंट मार्केटिंग कॉपोरेशन लि. यांना देण्यात आलेला आहे. मात्र काही तांत्रिक बाजू पडताळणी करण्यासाठी काम दिलेल्या ठेकेदाराने काही कागदपत्रे सादर करताना ती कायदेशीररीत्या स्टॅम्प पेपर लिहून देणे प्रस्तावित असते, या ठिकणी मात्र या कंपनीने स्वत:च्या कंपनीच्या नावाने असलेल्या लेटरहेडवर का लिहून दिले आहे? असा सवाल उपस्थित करीत याला जबाबदार कोण राहणार? याची विचारणा केली. यावेळी काही सदस्यांनी या बोगस कागदपत्रे सादर केल्याने या प्रस्तावाला विरोध केला, मात्र याची जबाबदारी पालिका प्रशासन घेईल असे स्पष्ट केल्यानंतर याला मंजुरी देण्यात आली.

या प्रस्तावातील कंपनीबाबत आयुक्तांनी सर्व चौकशी, महिती घेऊन खातरजमा केली आहे. याची जबाबदारी ठेकेदारावर असणार आहे. सर्व कागदपत्रांची पूर्तता केली असल्याची पोच पावती आहे.

-संदीप सांगवे, शिक्षण अधिकारी, शिक्षण विभाग, मनपा

या प्रस्तावाला परिवहन समिती सदस्यांनी आक्षेप घेतला होता. प्रशासनाने याची खातरजमा केल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पालिका याला जबाबदार राहील असे स्पष्ट केल्याने प्रस्ताव मंजूर केला आहे.

-सुरेश कुलकर्णी, सभापती, स्थायी समिती, मनपा

First Published on January 9, 2019 2:11 am

Web Title: students will get uniforms at the end of the academic year