24 October 2020

News Flash

करोनाविरोधातील लढय़ाला खासगी साथ

पनवेल पालिकेच्या प्रयत्नांना यश

(संग्रहित छायाचित्र)

पनवेल पालिकेच्या प्रयत्नांना यश

पनवेल : शहर महापालिकेच्या प्रयत्नानंतर अखेर मंगळवारी रोडपाली येथील स्वास्थ्य रुग्णालयात महिनाभरानंतर करोनाबाधित दाखल करण्यात आला आहे. ४० रुग्णांसाठी ‘स्वास्थ्य’ हे रुग्णालय कोविड रुग्णालय म्हणून यापुढे नागरिकांना रुग्णसेवा देणार आहे. एप्रिलमध्ये ‘स्वास्थ्य’ रुग्णालय आणि पनवेल पालिका प्रशासनाने महिनाभर २० खाटांची रुग्णसेवा दिली. कोटय़वधी रुपयांची नोटीस पनवेल पालिकेला पाठविल्यानंतर ही रुग्णसेवा बंद करण्यात आली. परंतु मंगळवारपासून बाधितांना खासगी स्वरूपात सेवा मिळणार आहे. सरकारी माफक दरात विमाधारकांना या रुग्णालयात  उपचार मिळू शकणार आहेत.

स्वास्थ्य रुग्णालयात सुमारे २०० खाटांची सोय आहे. ९ एप्रिलपासून येथे पालिकेने २० खाटा आरक्षित केल्या होत्या. मात्र, महिनाभरानंतर पालिकेला पाठविलेल्या देयकात एका खोलीमधील रुग्णाने चारशे लिटर पाणी वापरल्याने आणि विजेचा वापर केल्याने सहा लाख रुपयांचे देयक पनवेल पालिकेला स्वास्थ्य रुग्णालय प्रशासनाने पाठविले होते. त्यामुळे पालिकेने येथे रुग्ण पाठविण्याचे कमी केले. अखेर तीन महिन्यांनी पनवेल पालिकेला तीन महिन्यांसाठी साडेसहा कोटी रुपयांचे देयक स्वास्थ्य रुग्णालयाने इमारत वापरल्याने पाठविल्याने हे रुग्णालय वादात राहिले. पालकमंत्री अदिती तटकरे, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि आयुक्त सुधाकर देशमुख यांचा ‘स्वास्थ’च्या व्यवस्थापनासोबतचा संवाद फलदायी ठरला आहे.

एमजीएम फुल्ल

पनवेलकरांना प्राणवायू (ऑक्सिजन) यंत्र लागलेल्या खाटांची सध्या गरज आहे. मात्र प्रशासनाने केलेल्या नियोजनात ऑक्सीजन यंत्र लागलेल्या खाटांची तरतूद कमी प्रमाणात असल्याने कामोठे येथील एमजीएम आणि उपजिल्हा रुग्णालयावर ताण वाढला होता. ऑक्सीजनची आवश्यकता असणाऱ्या करोनाबाधित रुग्णांना खाटांअभावी परत पाठविले जात होते.

आवश्यकतेनुसार ऑक्सीजन खाटांसाठी एमजीएम व उपजिल्हा रुग्णालयांप्रमाणे  इतर रुग्णालयांत सोय केली आहे. मंगळवारी पहिला रुग्ण स्वास्थ रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे.    

-सुधाकर देशमुख, पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 1, 2020 3:48 am

Web Title: suasth hospital will now serve as covid hospital for 40 patients zws 70
Next Stories
1 समूह तपासणी मोहीम फलदायी?
2 नवी मुंबई पालिका आरोग्य विभागाची फेररचना करणार
3 कठोर टाळेबंदीतही मुक्तसंचार
Just Now!
X