महिला व तिच्या प्रियकराने दोन वर्षांच्या मुलीसह विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात मुलीचा मृत्यू झाला असून त्या दोघांची प्रकृती अत्यवस्थ आहे. ही घटना पनवेल येथील लॉजवर घडली असून केरळ येथे पतीची हत्या करून प्रियकरासह ही महिला दोन वर्षांच्या मुलासह पनवेल येथे आली होती.

लिजी कुरियन (वय २९, रा. ईडुक्की, केरळ) व तिचा प्रियकर वाशीम अब्दुल काजी (वय ३५, रा. वल्लीवथ्यम केरळ) असे पळून आलेल्या प्रियकर आणि प्रेयसीचे नाव आहे. वाशीम आणि लिजी हे दोघेही म्हसरूट हार्ट फार्म संतापूर केरळ येथे काम करीत होते. येथेच दोघांचे सूत जुळले. लिजी ही विवाहित होती व तिला दोनवर्षीय मुलगीही होती. या प्रेमात लिजी हिचा पती रिजोश याचा अडथळा येत असल्याने ३१ ऑक्टोबरला त्याची हत्या करून या दोघांनी मुलीसह पलायन केले होते. याबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

पनवेल येथील समीर लॉजमध्ये रूम क्रमांक १०१ मध्ये ते थांबले होते. ९ नोव्हेंबरला लॉज व्यवस्थापकाने पोलिसांना पाचारण केले. पनवेल पोलिसांना रूमचे दार उघडल्यानंतर आतमध्ये दोन वर्षांची चिमुरडी आणि हे दोघेही बेशुद्ध अवस्थेत आढळून आले. या तिघांना रुग्णालयात दाखल केल्यावर मुलीला मृत घोषित करण्यात आले तर त्या दोघांवर उपचार सुरू आहेत.

लॉजमध्ये त्यांच्या सामानाची झाडाझडती घेतल्यावर त्यांची ओळख पटली. ओळख पटल्यावर संबंधित पोलीस ठाण्यात माहिती दिल्यावर वरील प्रकार समोर आला. सध्या दोघांची प्रकृती नाजूक असून शुद्धीवर आल्यावर पुढील तपासाला वेग येईल, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी दिली.

लिजीचे दीर जिजोश विन्सेंन्ट यांनी पनवेल शहर पोलीस ठाणे येथे येऊन मयत मुलगी जोवाना हिची ओळख पटवून मृतदेह अंत्यविधीसाठी ताब्यात घेतला. रविवारी लिजी आणि वाशीम यांच्या विरोधात लिजीच्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी गुन्हा नोंद