29 October 2020

News Flash

पुन्हा निकृष्ट हातमोज्यांचा पुरवठा

सिडको प्रर्दशनी केंद्रातील कोविड रुग्णालयात दोन पीपीइ संच निकृष्ट आढळून आले.

वाशीतील सिडको प्रदर्शनी केंद्रातील रुग्णालयात पीपीइ संचातील मुखपट्टीही सदोष

नवी मुंबई : राज्यात काही रुग्णालयात निकृष्ट  पीपीई संच आढळून आल्याची कबुली राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली असतानाच नवी मुंबई पालिकेच्या वाशी येथील सिडको प्रर्दशन केंद्रात असा सदोष संच असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येत असलेल्या साहित्याचे लेखापरीक्षण करण्याची मागणी केली जात आहे.

या संचात निकृष्ट हातमोजे आणि मुखपट्टी असल्याचे सांगण्यात आले. मध्यंतरी हातमोज्यांचा दर्जा  ठरवलेल्या मानकांनुसार नसल्याने पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुरवठादारास  काळ्या यादीत टाकले आहे.करोनाकाळात नवी मुंबई पालिकेला हातमोजे, मुखपट्टी, जंतुनाशके, जेवण आणि औषधांचा विविध कंत्राटदारांमार्फत पुरवठा केला जात आहे. या वैद्यकीय साहित्य उत्पादनात दर्जा राखण्यात आला नसल्याचे तज्ज्ञांच्या पाहणीवरून स्पष्ट झाले आहे.

सिडको प्रर्दशनी केंद्रातील कोविड रुग्णालयात दोन पीपीइ संच निकृष्ट आढळून आले. त्यामुळे संच पुरवठदाराच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. हातमोज्यांचा दर्जा योग्य नसल्याचे स्पष्ट होऊनही पुन्हा तसाच प्रकार घडला आहे. मुखपट्टीसोबत असलेली तन्यता असलेली दोरी अधिक घट्ट असल्याने कानाला त्याचा त्रास होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. निव्वळ दोरा असलेली आणि कानाऐवजी गळ्याभोवती बांधण्याची सुविधा असलेली मुखपट्टी वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. करोनाकाळात पालिकेचे ९,०००सफाई कर्मचारी शहर स्वच्छ ठेवण्याची महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहेत. सफाई कर्मचाऱ्यांना पुरविण्यात येत असलेले हातमोजे निकृष्ट असल्याची तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते रवींद्र  सांवत यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. वैद्यकीय साहित्याचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारांचे मोठे जाळे पालिकेत असून काळ्या यादीत टाकलेले कंत्राटदार दुसऱ्या नावाने वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करीत असल्याचे दिसून आले आहे.

वाशी येथील करोना केंद्रातील तुरळक पीपीइ संच निकृष्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याची चौकशी केली जात आहे. ही संख्या नगण्य असली तरी वैद्यकीय साहित्यात तडजोड केली जाणार नाही.

-अभिजित बांगर, पालिका आयुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 16, 2020 12:22 am

Web Title: supply of inferior gloves akp 94
Next Stories
1 नवी मुंबईत रुग्णदुपटीचा काळ १११ दिवसांवर 
2 सातपट वाढीव मालमत्ता देयके
3 दीडऐवजी साडेतीन वाढीव चटई निर्देशांक मिळणार?
Just Now!
X