सध्याचे राज्य सरकार माथाडी कायदा मोडीत काढयाच्या प्रयत्नात असून माथाडी कायद्याच्या प्रश्नांसाठी आतापर्यत अनेकदा मुख्यंमत्र्याकडे मागण्या, विनंती बैठका केल्या तरी सरकारकडून कोणत्याही प्रकाराचा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता यापुढे सरकार जर माथाडी कामगारांचे प्रश्ना सोडविण्यासाठी तत्परता दाखविणार नसेल, तर राज्यभरातील माथाडी कामगार कोणत्याही क्षणी रस्त्यावर उतरुन लाक्षणिक संपाचे हत्यार उपसतील, असा इशारा माथाडी कामगार नेते तथा आमदार नरेंद्र पाटील यांनी दिला आहे.
माथाडी कामगार नेते अण्णासाहेब पाटील यांच्या ३४ व्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित केलेल्या माथाडी कामगार मेळाव्यात पाटील बोलत होते.
माथाडी कामगारांच्या न्याय हक्कसाठी व माथाडी कायदा टिकवण्यासाठी आता टोकाची भूमिका घ्यावी लागली तरी हरकत नाही. सध्याचे सरकार केवळ गोडबोले असून शेतकरी आणि कामगाराचे त्यांना काही देणे घेणे नाही, अशी टीका पाटील यांनी करत माथडीचे प्रश्ना सोडविले नाहीतर आम्हाला या सरकारची देखील गरज नाही असा संतप्त इशारा पाटील यांनी दिला.
तर माथाडी युनियनेचे कार्याध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे यांनी जे गुजरात मध्ये चालते ते महाराष्ट्रामध्ये कदापि होऊ देणार नाही.
आम्ही सरकारशी चर्चा करायला तयार आहोत, चर्चेत सकरात्मक निर्णय घेतला गेला नाही तर आम्हाला आमच्या अस्तित्वासाठी लढावेच लागेल आता आम्ही थांबणार नाही, असा इशारा शिंदे यानी सरकारला दिला आहे.

या मेळाव्यास माजी खासदार संजीव नाईक, वत्सलाताई अण्णासाहेब पाटील, युनियनचे सयुक्त सरचिटणीस तानाजी जगदाळे आदि मान्यवर उपस्थित होते.