30 May 2020

News Flash

दोन वर्षे नातेवाईकांशी संपर्कच नव्हता

कुटुंब संपविणाऱ्या प्रमुखाचा त्याच्या एकाही नातेवाईकाशी दोन वर्षे संपर्कच झाला नसल्याची माहिती उघड झाली आहे.

(संग्रहित छायाचित्र)

तळोजा आत्महत्या प्रकरणात पोलिसांची माहिती

नवी मुंबई : तळोजा येथे पत्नी आणि दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. मात्र हे पाउल का उचलण्यात आले या बाबतचे गूढ अद्यापही कायम आहे. कुटुंब संपविणाऱ्या प्रमुखाचा त्याच्या एकाही नातेवाईकाशी दोन वर्षे संपर्कच झाला नसल्याची माहिती उघड झाली आहे.

तळोजा सेक्टर-९ येथील शिव कॉर्नर इमारतीत ही घटना घडली आहे. मृत नितेशकुमार उपाध्याय यांनी पत्नी, एक मुलगा आणि  मुलीची हत्या केली. त्यानंतर आत्महत्या केली.

दोन महिन्यांनी घटना उघडकीस आली होती. हे कुटुंब सदनिकेत राहत होते, ती सदनिका त्यांनी भाडय़ाने घेतली होती. डिसेंबरपासून भाडे दिले नाही आणि दोन महिन्यांपासून संपर्कात नसल्याने सदनिकेचे मालक घटनास्थळी पोचले. त्यानंतर हा प्रकार उजेडात आला.

यावेळी घरात दोन चिठ्ठय़ा आढळून आल्या होत्या. त्यापैकी एका चिठ्ठीत मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये आणि दुसऱ्या चिठ्ठीत घरात रोकड आणि दागिने ठेवल्याचा उल्लेख करीत आमचा अंत्यविधी हिंदू पद्धतीने करा आमचे कोणी नाही, असे हिंदीतून नमूद केले होते. या घटनेचा तपास करीत असताना उपाध्याय हे दिल्लीचे असल्याचे समोर आले आहे. घरातील काही कागदपत्रात त्यांच्या भावाचा संपर्क क्रमांक मिळाला. त्याआधारे याबाबत त्यांना कळविल्यानंतर ते २४ फेब्रुवारी रोजी तळोजात दाखल झाले. त्यांच्या चौकशीतूनच नितेशकुमार आणि अन्य नातेवाईकांचा गत दीड दोन वर्षांपासून संपर्क झाला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. नितेशकुमार यांच्या मुलांच्या शाळेत चौकशी केली असता ३ जानेवारीपासून मुले आली नसल्याचे शाळा व्यवस्थापनाने सांगितले. त्यामुळे ही घटना ३ जानेवारी नंतरच घडली, या निर्णयाप्रत पोलीस आले आहेत.पोलीस आता नितेशकुमार कुटुंबांचा वैद्यकीय इतिहास तपासात आहेत. त्यातून काही निष्पन्न होते का, याची चाचपणी सुरू आहे. तसेच चौघांचे मृतदेहाचे शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाल्यावर काही निष्पन्न होईल का, याचीही प्रतीक्षा आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली. प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय आडागले यांनी आमचा तपास सुरू असल्याचे सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 27, 2020 12:06 am

Web Title: taloja suicide case police information akp 94
Next Stories
1 पाणथळ जमिनी ‘सेझ’च्या घशात
2 दिघ्यातील तीन नगरसेवक शिवसेनेत?
3 किलबिल किलबिल पक्षी बोलती..
Just Now!
X