महिनाभरात २०,७७७ रुग्ण करोनामुक्त तर १२, ५८६ जण करोनाबाधित

नवी मुंबई : एप्रिलमध्ये घसरलेला करोनामुक्त रुग्णांचा दर गेला महिनाभर सतत वाढता राहिल्याने शहराला मोठा दिलासा मिळाला आहे. ८५ टक्केवरून हा दर ९६ टक्केपर्यंत गेला आहे. १८ एप्रिलपासून शहरात एकूण १२,५८६ नवे करोनाबाधित रुग्ण सापडले तर करोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या २०,७७७ इतकी आहे.

शहरासाठी दिलासादायक बाब म्हणजे करोनाची दैनंदिन रुग्णसंख्या घटली आहे. एक हजारावर गेलेली रुग्णसंख्या आता २०० पेक्षा कमी झाली आहे. एप्रिलमध्ये महिनाभरात सुमारे २८ हजारांपेक्षा जास्त रुग्ण सापडले होते. त्यामुळे शहरात करोनामुक्तीचा दरही कमी झाला होता. परंतु १८ एप्रिलपासून

नव्या करोना रग्णांची संख्या

घटत गेली. प्रत्येक दिवशी नवे रुग्ण कमी, तर करोनामुक्त रुग्ण

जास्त अशी परिस्थिती निर्माण झाल्याने शहरावरील संकट टळले आहे. आता सर्व प्रकारच्या खाटा उपलब्ध आहेत.

करोनामुक्तीचा दर

सप्टेंबर : ८५ टक्के

ऑक्टोबर : ८८ टक्के

नोव्हेंबर : ९४ टक्के

डिसेंबर : ९६ टक्के

जानेवारी :९६ टक्के

फेब्रुवारी : ९६ टक्के

मार्च : ९४.८६ टक्के

एप्रिल : ८४ टक्के

मे : ९६.०७ टक्के

नवी मुंबईत मागील महिनाभरात सलग ३० दिवस करोनाच्या नव्या रुग्णांपेक्षा करोनातून मुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. हे समाधानकारक चित्र असून यामध्ये नागरिकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे. यापुढेही अधिक सतर्क राहिले पाहिजे.

-अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका