29 October 2020

News Flash

विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण करणारा गजाआड

वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी त्वरित कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.

संग्रहित प्रतीकात्मक छायाचित्र

नवी मुंबई : विद्यार्थिनीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका शिक्षकास कोपरखरणे पोलिसांनी अटक केली आहे. बदनामी करण्याची धमकी दिल्यानंतरही पीडितेने धाडस करीत त्याच्या विरोधात गुन्हा नोंद केला.

संजय भालचंदानी असे अटक आरोपी शिक्षकाचे नाव आहे. पीडिता कोपरखैरणे परिसरात राहणारी असून वाशी येथे खाजगी शिकवणीत जात होती. टाळेबंदीपूर्वी तिला घरी सोडतो सांगत स्वत:च्या घरी नेवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. कोणाला सांगितले तर ठार मारण्याची धमकीही दिली. दरम्यान तिने या खासगी शिकवणीशी संपर्क ताडला होता. मात्र आरोपीने पुन्हा तिला संपर्क करीत शरीर सुखाची मागणी करीत बदनामीची धमकी दिली. त्यामुळे पीडित मुलीने घडलेला सर्व प्रकार पालकांना सांगितला. त्यानंतर पालकांनी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करीत गुन्हा नोंद केला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूर्यकांत जगदाळे यांनी त्वरित कारवाई करीत आरोपीला अटक केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 12:52 am

Web Title: teacher arrested for molesting student in kopar khairane zws 70
Next Stories
1 तीन महिन्यांत आरोग्य सुविधांचा कायापालट
2 हिरवी मिरची महागली
3 विजेविना जनजीवन ठप्प
Just Now!
X