26 November 2020

News Flash

दहावी-बारावी फेरपरीक्षा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी फेरपरीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली.

नवी मुंबईत सहा केंद्रांवर १२७८ परीक्षार्थी

लोकसत्ता वार्ताहर

नवी मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या इयत्ता दहावी व बारावीच्या लेखी फेरपरीक्षेला शुक्रवारपासून सुरुवात झाली. मुखपट्टी वापर, सामाजिक अंतर, सॅनिटायझर, ताप तपासणी करीत विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर सोडण्यात आले. नवी मुंबईत सहा केंद्रांवर १२७८ विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

दहावीची परीक्षा ५ डिसेंबर तर बारावीची परीक्षा १० डिसेंबपर्यंत सुरू राहणार आहे. नवी मुंबईत दहावीचे ४०५, तर बारावीचे ८७३ विद्यार्थी आहेत. मुंबई विभागातून दहावीचे १३,४८० तर बरावीचे २२,८४० विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.

दहावी व बारावीच्या फेरपरीक्षा घेण्यास सुरुवात झाली आहे. करोना साथरोगाच्या पाश्र्वभूमीवर सर्व दक्षता घेतली जात असून पहिल्या दिवशी सर्वच केंद्रांत शांततेत परीक्षा पार पडली.
– संदीप सांगावे, विभागीय सचिव, मुंबई विभागीय शिक्षण मंडळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 21, 2020 1:56 am

Web Title: tenth and twelth reexamination dd70
टॅग Coronavirus
Next Stories
1 सोनसाखळी चोरीचे वीस गुन्हे उघडकीस
2 पनवेलमध्ये शाळांबाबत संभ्रम
3 पालकांची नकारघंटा
Just Now!
X