News Flash

यंदाच्या भाऊबीजेला कोटींची उड्डाणे

भाऊ-बहिणीच्या नात्यातील संबंध हे अनेक अर्थाने भावनात्मक असतात.

दिवाळीतील शेवटचा आणि महत्त्वाचा दिवस म्हणून भाऊबीजेच्या सणाला महत्त्व असून, या दिवशी भाऊ आपल्या बहिणीला ओवाळणी म्हणून भेटवस्तू देतो. भाऊ-बहिणीच्या नात्यातील संबंध हे अनेक अर्थाने भावनात्मक असतात. त्यामुळे केवळ भेटवस्तू मिळेल म्हणून हा सण साजरा केला जात नाही. मात्र येथील शेतीमुळे त्यांच्या वाढत्या किमती व त्यातील वाटय़ामुळे भाऊ-बहिणींच्या नात्यात दुरावा आला आहे. त्याचवेळी या भाऊबीजेदरम्यान अनेक शेतकरी व त्यांच्या वारसांना सिडको आणि शासनाकडून जमिनीचे वाढीव दर मंजूर झाले आहेत. यामध्ये उरण तालुक्यात तब्बल अडीचशे कोटी रुपये आले असल्याची चर्चा असून, यावेळी भाऊबीजेला कोटी कोटींची उड्डाणे होणार आहेत.

४३ वर्षांपूर्वी नवी मुंबईतील बेलापूरपट्टी तसेच उरण व पनवेल तालुक्यातील एकूण ९५ गावांतील जमिनी शासनाने सिडकोकडून नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी संपादित केल्या आहेत. त्यावेळी येथील शेतकऱ्यांना शासनाने पाच रुपये प्रति चौरस मीटरचा दर जमिनीला दिला होता. नवी मुंबई शहर व मुंबईलगत असलेल्या या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांच्या जमिनीच्या किमती या शासनाने दिलेल्या दरापेक्षा कितीतर अधिक दराच्या असल्याने येथील शेतकरी व त्यांच्या वारसांनी वाढीव दर मिळावा याकरिता न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने शेतकरी आणि सरकारची बाजू ऐकल्यानंतर शेतकऱ्यांना वाढीव दर देण्याचा निर्णय घेतला. यामध्ये कित्येक शेतकऱ्यांना प्रति चौरस मीटरला २५० रुपयांपासून ते ६००, तर काहींना ८०० रुपये प्रति चौरस मीटरचा दर मिळाला आहे. त्यामुळे जमिनीच्या वाढीव किमतीमुळे ५ कोटींपासून ते २० कोटींपर्यंत अनेक शेतकऱ्यांना मिळाले आहेत, तर अनेक दावे न्यायालयात आहेत. मात्र हे दर मोजक्याच शेतकऱ्यांना मिळाले आहेत. असे असले तरी त्यामुळे १९८६-८७ व त्यानंतर साडेबारा टक्केच्या पैशानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हाती पैसा आला आहे. यावेळी शेतकऱ्यांच्या वारसात वाद न होता अनेकांना आपल्या बहिणींनाही वाटा देत न्यायालयाची वाट धरणे टाळले आहे. त्यामुळे यावर्षीची भाऊबीज ही अनेक भाऊ आणि बहिणींसाठी कोटी कोटींची उड्डाणे घेऊन येणार आहे. यापूर्वी वडिलांच्या मालमत्तेत आपल्याला वाटा मिळावा यासाठी अनेक बहिणींनी आपल्या भावांविरोधात न्यायालयात दावे दाखल केले आहेत. त्यामुळे अनेक बहीण-भावांच्या नात्यात रक्षाबंधन व भाऊबीजेच्या प्रथाच बंद पडल्या आहेत. यामध्ये नव्याने सुधारणा होऊन पुन्हा एकदा हे नाते अधिक संपत्तीच्या येण्याने मजबूत होऊ लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2015 4:39 am

Web Title: the great grand bhau beej for uran
टॅग : Diwali
Next Stories
1 पन्नास रुपयांच्या फटाक्यांत दिवाळी
2 मुंबईतील मिठागरे, कचराभूमीचा नवी मुंबईला ताप
3 दिघ्यातील दुहेरी हत्येचे गूढ उकलले
Just Now!
X