बुधवारी ५१९ नवे करोनाबाधित

नवी मुंबई : शहरात बुधवारी ५१९ नवे करोना रुग्ण सापडले. धक्कादायक म्हणजे ही दैनंदिन रुग्णसंख्या करोनाकाळातील आतापर्यंतची सर्वाधिक आहे. दिवसाला किमान पाचशे रुग्णांची भर पडत असल्याने शहरासाठी हा धोक्याचा इशारा आहे.

नवी मुंबईत करोनाचा पहिला रुग्ण १३ मार्च २०२० रोजी सापडला होता. आतापर्यंत बाधितांची संख्या ही ६० हजारांपेक्षा अधिक झाली असून ११५८ जणांचा मृत्यू झाला आहे.

डिसेंबर, जानेवारी महिन्यात करोना रुग्णांची संख्या कमी होत नवी मुंबईतील परिस्थिती अत्यंत नियंत्रणात आली होती. त्यामुळे शहरात सर्व व्यवहार पूर्वपदावर आल्यानंतर करोना संपला अशी मानसिकता होत नागरिकांनी घराबाहेर पडणे सुरू केले होते. त्याचा वाईट परिणाम आता दिसू लागला आहे.

१ फेब्रुवारीपासून शहरात पुन्हा दैनंदिन रुग्णांत वाढ सुरू झाली असून ५० पर्यंत खाली आलेली दैनंदिन रुग्णसंख्या शंभपर्यंत गेली. फेब्रुवारीत महिनाभर १०० पर्यंत असलेली दैनंदिन रुग्णसंख्या मार्चमध्ये पुन्हा वाढत गेली. ८ मार्च रोजी शहरात १०९ दैनंदिन करोना रुग्णांची संख्या होती. पुढील आठ दिवसांत त्यात ५० रुग्णांची वाढ होत दीडशेपर्यंत गेली होती. १५ मार्च रोजी करोनाचे दैनंदिन रुग्ण हे १३६ होते. यात दोन दिवसांत १८२ रुग्णांची वाढ होत १७ मार्च रोजी शहरात ३१८ नवे रुग्ण सापडले. त्यात वाढ होत सोमवारी ही दैनंदिन रुग्णवाढ ४५६ पर्यंत गेली होती. मंगळवारी ५१९ रुग्ण सापडले असून ही दैनंदिन रुग्णसंख्या ही आतापर्यंतची सर्वाधिक आहे. त्यामुळे पुढील काळात शहरावर आणखी कडक निर्बंधयेण्याची शक्यता आहे.

आठ दिवसांतील करोना रुग्ण

१५ मार्च :     १३६

१६ मार्च :     २२५

१७ मार्च :     ३१८

१८ मार्च :     २९४

१९ मार्च :     ३४७

२० मार्च :     ३४८

२१ मार्च :     ४१६

२२ मार्च :     ४०४

२३ मार्च :     ४५६

२२ मार्च :     ५१६

शहरातील करोना स्थिती

  •  नवे रुग्ण  :         ५१९
  •  आजचे मृत्यू :    ३
  •  एकूण मृत्यू  :     ११५८
  •  एकूण रुग्णसंख्या :        ६०,९९५
  •  एकूण करोनामुक्त :        ५६,२००
  •  आजचे करोनामुक्त :      १६०
  • उपचाराधीन रुग्ण :        ३६३७

बुधवारी वाढलेले विभागवार रुग्ण

  •  बेलापूर –     ७४
  • नेरुळ –    ९५
  • वाशी –   ५७
  •  तुर्भे –      ४२
  • कोपरखैरणे –   ७०
  •  घणसोली –    ५५
  • ऐरोली – १२०
  •  दिघा –    ६
  •  एकूण वाढ –    ५१९

शहरात करोनाची दररोजची नवी रुग्णसंख्या खूप वेगाने वाढत आहे. बुधवारी शहरात करोनाकाळातील सर्वोच्च वाढ असून यात मोठी वाढ होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घ्यावी. प्रशासन खाटांची संख्या वाढवत असून तुटवडा भासणार नाही, याबाबत खबरदारी घेत आहे. – अभिजित बांगर, आयुक्त, महापालिका