06 December 2019

News Flash

फरार मुख्य आरोपी अट्टल गुन्हेगार

पोलीसांनी विकीवर नियंत्रणासाठी त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस केली.

संतोष सावंत, पनवेल

दहा वर्षांपूर्वी गव्हाण कोपर गावात राहणाऱ्या विकी देशमुख याने चोऱ्यांपासून गुन्हेगारीचा प्रवास सुरु केला. उलवा नवघर हे वाहनचोरी व कंटेनरमधील माल चोरत असे. त्यानंतर विकसकांना धमकावणे सुरु केले. त्यासाठी एका विकसकाच्या कार्यालयावर दिवसा गोळीबार करुन  दूरध्वनी करुन विकासकाला स्वत:ची ओळख करुन दिली.  त्यानंतर तो कारागृहात शिक्षेसाठी गेला  त्याने कारागृहातच कैद्यांसोबत मैत्री करुन स्वताची टोळी बनविली.   कारागृहात  साम्राज्य निर्माण करण्यासाठी विकीने कारागृह निरीक्षकावर गोळीबार करण्याचा कट यशस्वी केला. पोलीसांनी विकीवर नियंत्रणासाठी त्याच्याविरोधात मोक्का अंतर्गत कारवाईची शिफारस केली. मात्र  पोलीसांचा दावा दुबळा ठरला. शिफारस फेटाळण्यात आली.  कल्याण येथील तहसिलदारांची सूपारी देऊन झालेल्या हत्येमध्ये  नाव आल्याने विकीचे हात सरकारी अधिकाऱ्यांच्या गळ्यापर्यंत पोहचल्याचे समोर आले.  पनवेल पालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याशी वाहन पुढे घेण्यावरुन झालेल्या क्षुल्लक तंटय़ावरुन धमकाविल्याचे प्रकरण गाजले होते. सचिन गर्जे हा विकीचा साथीदार होता.  कारागृहातून बाहेर पडल्यावर विकी सचिनला काही रक्कम देणार होता. मात्र ती रक्कम न मिळाल्याने  सचिनने तगादा लावला. याचाच राग मनात धरून  विकी व त्याच्या साथीदारांनी सचिनची हत्या केली, असे सांगितले जाते. विकीच्या टोळीतील साथीदार या घटनेनंतर विकीपासून दूर जाण्याच्या पवित्र्यात आहे. फरार विकीला अटक केल्यानंतरही तो कारागृहातून टोळी चालविण्यास समर्थ असल्याने पोलिसांची ती एक डोकेदुखी झाली आहे.    विकीवर पुणे, ठाणे, रायगड या विविध जिल्ह्य़ात ५० हून अधिक गुन्हे विकीवर दाखल आहेत.  नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजयकुमार हे विकी देशमुखच्या प्रकरणात नेमकी कोणती भूमिका घेतात याकडे साऱ्या पोलीस दलाचे लक्ष लागले आहे.

First Published on December 3, 2019 3:02 am

Web Title: the main absconding accused in murder case is hardcore criminal zws 70
Just Now!
X