नवी मुंबई महापालिका क्षेत्रात करोनाबाधितांची संख्येने २१ हजाराचा टप्पा पार केलाआहे. शहरात आज २४० नवे करोनाबधित रुग्ण आढळले  तर पाच रुग्णांचा मृत्यू झाला. शहरातील  करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत आहे.

वाढत्या संसर्गामुळे शहरात करोनाबाधितांची  एकूण संख्या २१ हजार १४० झाली आहे. शहरात मृतांची संख्याही दररोज वाढत आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या ५११ झाली आहे.  आतापर्यत एकूण  १७ हजार १२६ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३ हजार ५०३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

शहरात आतापर्यंत ५३ हजार ९०७ नागरीकांच्या प्रतिजन चाचण्या करण्यात आल्या आहे. एक दिवसांत अडीच हजारांपेक्षा अधिक करोना चाचण्या होत आहेत. करोनामुक्तीचा दर ८१ टक्के झाला  आहे. नवी मुंबईत एकूण ९४ हजार ६१० नागरिकांची करोना चाचणी करण्यात आली आहे.