नवी मुंबईत करोनाबाधितांच्या संख्येत दररोज मोठी वाढ होत असून मृतांची संख्याही दररोज वाढत आहेत. वाढत्या संसर्गामुळे शहरात आज ३५२ नवे रुग्ण वाढले असून शहरात करोनाबाधितांची एकूण संख्या ११,१३८ झाली आहे.

शहरात आज १० जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून करोनामुळे मृत पावलेल्यांची एकूण संख्या ३४० झाली आहे. शहरात आतापर्यंत तब्बल ६,९८८ रुग्ण करोनामुक्त झाले आहेत. तर शहरात ३,८१० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी शहरात प्रतिजन चाचणीला सुरुवात केली आहे. बांगर यांच्यासमोर शहरातील करोना प्रादुर्भाव रोखण्याचे मोठे आव्हान आहे.

नवी मुंबई शहरातील लॉकडाउनबाबत अद्याप निर्णय घेतला नसून रविवारी निर्णय घेण्यात येईल असे आयुक्त बांगर यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.