News Flash

बेव्हँसिझुम इंजेक्शनची बेकायदा विक्री करणाऱ्या तिघांना अटक

दोन इंजेक्शन जप्त केली आहेत.

नवी मुंबई : गुन्हे अन्वेषण विभागाने गैरमार्गाने व नफेखोरीच्या उद्देशाने ‘बेव्हँसिझुम’ हे इंजेक्शन विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त करण्यात आले आहेत.

जयेशकुमार कलाल, अमोल राजपूत आणि आशीष चौरासिया असे अटक आरोपींची नावे आहेत. हे तिघेही नफेखोरीच्या उद्देशाने करोना रुग्णांना उपचारासाठी लागणारे बेव्हँसिझुम हे इंजेक्शन विक्री करण्यास येणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाला मिळाली होती. याबाबत पोलिसांना कळवल्यावर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक निरीक्षक हर्शल कदम, हवालदार रोहिदास पाटील, विश्वास पवार, शशिकांत जगदाळे, बालाजी चव्हाण यांनी सापळा रचून खैरणे एमआयडीसीतील रिलायन्स रुग्णालयाच्या जवळ या तिघांना अटक केली. त्यांच्याकडून दोन इंजेक्शन जप्त केली आहेत. आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे रेमडेसिविर, बेव्हँसिझुम इंजेक्शनच्या चिठ्ठ्याही आढळून आल्या आहेत, अशी माहिती शिंदे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2021 12:06 am

Web Title: three arrested for illegally selling bevanzizum injections akp 94
Next Stories
1 लवादाच्या निर्णयाविरोधात पालिका उच्च न्यायालयात
2 एमआयडीसीतील अग्निसुरक्षेकडे दुर्लक्ष
3 मुदतवाढ नको, आता सिडको घरांचा ताबा द्या!
Just Now!
X