तीन पक्षीनिरीक्षकांकडून पक्ष्यांच्या ५० विविध प्रजातींचा खारघरमध्ये शोध

संतोष सावंत, लोकसत्ता

Mahavikas Aghadi, Kapil Patil,
महाविकास आघाडीतील विसवंदामुळे भिवंडीत कपिल पाटील यांना कठीण पेपर सोपा?
Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
shivpal yadav
समाजवादी पक्षातील उमेदवारांच्या फेरबदलामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम; बदायूमधून कोणाला मिळणार उमेदवारी?
vanchit bahujan aghadi declare candidate second list for lok sabha election
वंचितची दुसरी यादी जाहीर; उमेदवारांच्या जातीचाही उल्लेख

पनवेल : खारघरमधील डोंगराची रांग, माळरान, खार जमिनी, पाणथळ जागा आणि कांदळवनांमध्ये पक्ष्यांच्या ५० विविध प्रजाती आश्रयाला असल्याचे पक्षीनिरीक्षकांच्या गेल्या तीन वर्षांतील शोधातून स्पष्ट झाले आहे.

नियोजित शहर म्हणून खारघरची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत या शहरात सिमेंटची जंगले उभी राहिल्याने निसर्ग संपदा नष्ट होईल, अशी भीती पक्षीप्रेमींकडून व्यक्त केली जात होती.

तीन पक्षीमित्रांनी एकत्र येऊन खारघरमधील किलबिलाट कॅमेराबद्ध केली. गेली तीन वर्षे हा शोध जारी होता. यात ज्योती नाडकर्णी, नरेश चंद्रसिंग आणि तरंग सरीन यांचा समावेश आहे. या तिघांनी या  शहराभोवतीच्या डोंगररांगा, पाणथळ, खारजमिनी, कांदळवने पालथी घातली. त्यातून ही संपदा त्यांना गवसली. ज्योती यांनी पशू रुग्णालयात दहा वर्षे सेवा केली आहे. त्यानंतर त्यांनी दक्षिण आफ्रिकेत केलेल्या पक्षी निरीक्षणाच्या अनुभवाचा उपयोग या मोहिमेत केला.

मोहीम अशी..

-या मोहिमेत ‘बर्ड रिंगिंग’ पद्धत अवलंबण्यात आली. ‘रिंगिंग’ म्हणजे पक्ष्यांना ‘जाळ्या’त (नेट) पकडून त्यांचे लिंग (नर वा मादी),  वय आणि वजनाची नोंद करणे.

-त्यानंतर पक्ष्याच्या पायात लहानशी रिंग घालून त्यात नोंदणी क्रमांक टाकणे. नोंदविलेल्या निरीक्षणाची माहिती पुन्हा संगणकीय स्वरूपात जमा करणे.

ग्रेटर फ्लेमिंगो, स्थलांतरित फ्लेमिंगो, रुडी शेलडक, ब्राह्मणी डक, बारटेल व ब्लॅकटेल गोडवीट (नामशेष होण्याच्या मार्गावर), माणसांचा वावर आणि पक्ष्यांना वाटणाऱ्या असुरक्षिततेमुळे पक्ष्यांचे खारघरमधील स्थलांतर वाढले आहे. अनेक परदेशी पक्ष्यांना मुबलक पाणी आणि राहाण्यासाठी खारघर हे सुरक्षित वाटते. मात्र विकासाची गती पाहता पक्ष्यांचा मागील तीन वर्षांच्या तुलनेत यंदा प्रमाण कमी झाले आहे. पेन्टेड स्टोर्क (बगळे) त्यांच्या पंखाखालच्या गुलाबी आणि काळ्या रंगाचे पट्टे पंखांवर असतात. हे बगळे मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यांमुळे अनेकदा हे खास बगळे पक्षी आकाशात घिरटय़ा मारतात मात्र खाली उतरत नाहीत.

निरीक्षणाची जागा

* खारघर येथील सेक्टर-१७ मधील संजीवनी विद्यालयाच्या समोरील कांदळवन

* संजीवनी विद्यालयाच्या पुढील दिशेसमोरील सेक्टर २५ ते २७ खारजमीन, पाणथळ, कांदळवन

* खारघर डोंगरांची रांग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ड्रायव्हिंग रेंजचा परिसर आणि तेथून थेट पांडवकडा

*  खारघरमधील सेक्टर-३५ येथील तळोजा मध्यवर्ती कारागृह ते व्हॅलीशिल्प गृहसंकुलाच्या मधल्या बाजूवरील पाणथळ जमिनीवर, आणि त्याच्या डाव्या बाजूला डोंगरावर

सोयीची जागा हवी

आजवर मोहिमेत शेकडो विविध प्रजातीच्या पक्ष्यांचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. या नोंदणीनुसार खारघरमधील पक्ष्यांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यासाठी  सोयीची जागा हवी आहे. त्यासाठी सरकारी प्राधिकरणांच्या प्रमुखांकडे पाठपुरावा करण्याची आवश्यकता असल्याचे मत ज्योती नाडकर्णी यांनी व्यक्त केले.