News Flash

 ‘स्वप्न’ कोसळले

‘स्वप्न साकार’ इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले.

‘स्वप्न साकार’ इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले.

दारावेतील ‘स्वप्न साकार’ इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळून तीन जखमी

नवी मुंबई : नवी मुंबईतील दारावे गाव सेक्टर २३ येथील ‘स्वप्न साकार’ इमारतीच्या दोन मजल्यांचे स्लॅब कोसळून तिघे जखमी झाले. या इमारतीला तडे गेल्यामुळे तिची बाहेरून दुरुस्ती करण्यात येत होती. त्याच वेळी पहिल्या मजल्यावरील एका घराची अंतर्गत दुरुस्तीही सुरू होती. त्या घराचा स्लॅब कोसळल्यामुळे ही दुर्घटना घडली. सुमती चौहान (३५) प्रितम चौहान (४०) आणि अनुसया चौहान (६८) अशी जखमींची नावे असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

‘स्वप्न साकार’ इमारतीचे बांधकाम १९९६ मध्ये करण्यात आले. या इमारतीला बाहेरूनही तडे गेले आहेत. त्यामुळे इमारतीची दुरुस्ती करण्यात येत होती. इमारतीतील पहिल्या मजल्यावरील घर क्रमांक ७ मध्ये अंतर्गत दुरुस्ती सुरू होती. या घराचा स्लॅब तळ मजल्यावरील घर क्रमांक २वर कोसळला. त्यात चौहान कुटुंबातील तिघे जखमी झाले. आणखी एक सदस्य कामानिमित्त बाहेर गेल्याने तो बचावला. जखमींवर नेरुळ येथील तेरणा रुग्णालयात उपचार करून नंतर त्यांना बॉम्बे रुग्णालयात पाठविण्यात आले.

दुर्घटनेची माहिती मिळताच नेरुळ अग्निशमन दलाचे जवान आणि पोलीस व नवी मुंबई महापालिकेचे विभाग अधिकारी घटनास्थळी आले. पालिकेने ही इमारत सील केली असून इमारतीत जाण्यास व राहण्यास प्रतिबंध केला आहे. सामान इमारतीतच अडकल्यामुळे रहिवाशांचे हाल होत आहेत. नवी मुंबई महापालिकेचे एकही संक्रमण शिबीर नसल्याने दुर्घटनाग्रस्त इमारतीमधील रहिवाशांची सोय रात्रनिवारा शिबिरात करावी लागली आहे.

इमारतीत राहण्यास प्रतिबंध करण्यात आला असून त्यांची राहण्याची व्यवस्था बेलापूर येथील रात्रनिवारा शिबिरात करण्यात आली आहे.  इमारतीचे संरचनात्मक परीक्षण झाले आहे की नाही याची पाहणी करून दुरुस्तीचे करणाऱ्या कंत्राटदार व इतरांवर कारवाई करण्यात येईल.

– शशिकांत तांडेल, विभाग अधिकारी, बेलापूर

दारावे गाव येथील दुर्घटनेबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पालिकेच्या नियमांनुसार त्यांनी अहवाल दिल्यानंतर त्यांच्या निर्देशानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल.

– सचिन राणे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, नेरुळ

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2018 2:50 am

Web Title: three injured in slab collapse in navi mumbai swapna sakar building
Next Stories
1 मोठे खड्डे बुजवले; छोटे जैसे थे
2 विष्णुदास भावे नाटय़गृहाचे नूतनीकरण सप्टेंबरपासून
3 धरण भरले; नळ कोरडेच!
Just Now!
X