06 April 2020

News Flash

उरणमध्ये महिलेवर सामूहिक अत्याचार

महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरणही करण्यात आले होते.

उरण : उरणमधील करंजा परिसरात राहणाऱ्या खलाशी कुटुंबातील एका विवाहित महिलेवर तीन इसमांनी सलग तीन ते चार दिवस अत्याचार केला. तिचा पती मासेमारीसाठी बोटीवर गेले होते. या संदर्भात उरण पोलिसात गुन्हा दाखल केला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. महिलेवर अत्याचार केल्यानंतर त्याचे मोबाइलमध्ये चित्रीकरणही करण्यात आले होते. याचा उरण पोलीस अधिक तपास करीत आहेत. अजिंक्य दाभोळकर, वैभव कोळी व विश्वनाथ गायकवाड अशी आरोपींची नावे आहेत.  घरात महिला एकटीच असल्याचा फायदा घेत या तिघांनी तिच्यावर वारंवार अत्याचार केले. यावेळी त्यांनी चित्रीकरण करून ते पसरविण्याची धमकी या महिलेला देण्यात आलेली होती.  असे असतानाही आपल्यावर झालेल्या अत्याचाराविरोधात महिलेने उरण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर उरण पोलिसांनी तिघांनाही अटक केली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 17, 2019 2:58 am

Web Title: three people arrested for gang rape of woman in uran zws 70
Next Stories
1 कोकणात पक्ष मागे का?
2 पळपुटय़ांना मतदार धडा शिकवतील
3 नाईकांसमोर नवे विघ्न
Just Now!
X