करोना रुग्णांचे विसंगत अहवाल दिल्याचा आरोप असलेल्या थायरो केअर या नवी मुंबई स्थित आंतरराष्ट्रीय खासगी प्रयोगशाळेला यापुढे नवी मुंबई पालिका क्षेत्रात रुग्णांच्या घशातील द्रावाचे नमुने गोळा करण्यास पालिकेने सोमवारी बंदी घातली. यापूर्वी ठाणे आणि पनवेल पालिकेने या प्रयोगशाळेला करोना नमुने जमा करण्यास मनाई केलेली आहे. आयसीएमआर व राज्य सरकारने या खासगी प्रयोगशाळेला करोना रुग्णांचे नमुने गोळा करण्याची परवानगी दिली असल्याने तुर्भे येथील मुख्य प्रयोगशाळेला टाळे लावण्याबाबत नवी मुंबई पालिकेन मात्र सोमवारी घुमजाव केले.