News Flash

वारुनिया विघ्ने निरोप घ्यावा

गणेशभक्तांना सहकार्याचे आवाहन

विसर्जन सोहळ्यासाठी पोलीस, पालिका प्रशासन सज्ज; गणेशभक्तांना सहकार्याचे आवाहन

दिघा ते सीबीडी बेलापूर परिसरातील २३० सार्वजनिक गणेशमूर्तीचे गुरुवारी २३ तलावांवर विर्सजन होणार आहे. यासाठी पोलीस आणि पालिका प्रशासनाने विसर्जन मिरवणुकांची तयारी पूर्ण केली आहे. या वेळी नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आहे.

गणरायाला सुखरुप निरोप देण्यासाठी तलाव आणि विर्सजन मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. विसर्जन काळात समाजविरोधी कोणतेही कृत्य घडू नये याकडे पोलिसांची करडी नजर राहील. शहरांमधील महत्त्वाच्या ठिकाणी बॉम्ब शोधक पथके आणि बॉम्बनाशक  पथकेही तैनात करण्यात आली आहेत. यासाठी बुधवारी श्वान पथकांच्या मदतीने तपासणी करण्यात आली.

सायंकाळनंतर विसर्जन स्थळी वीज पुरवठा खंडीत झाल्यास प्रकाश झोतासाठी जनित्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. विर्सजन स्थळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दोन पोलीस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलीस आयुक्त, २२ पोलीस निरीक्षक, ९८ सहाय्यक आणि उपनिरीक्षक, ८५७ पोलीस कर्मचारी, २० होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. या वेळी विविध महाविद्यालयातील १५० विद्यार्थी आणि इतर स्वयंसेवी संस्थांचे कार्यकर्ते पोलिसांना या कामी मदत करणार आहेत.

विर्सजन मार्गावरील मुख्य रस्ता इतर वाहनांसाठी बंद असेल. यासाठी ठिकठिकाणी बॅरीकेट्स टाकण्यात आले आहेत. साध्या वेशातील पोलिसांची पथके मिरवणुकीवर लक्ष ठेवणार आहेत. मद्य प्राशन करून मंडळांच्या मिरवणुकांमध्ये नाचणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पथक नेमण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मद्यपान करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

याच वेळी समाजोपयोगी उपक्रम राबवणाऱ्या आणि शिस्तबद्ध गणेश मंडळांना उत्कृष्ट गणेशमूर्ती, उत्कृष्ट देखावा, सामाजिक उपक्रम, उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन, शांततेत मिरवणुका काढणाऱ्या मंडळांना प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात येणार आहे. ही बक्षीसे पोलीस ठाण्याच्या पातळीवर दिली जातील. यासाठी शहरातील शांतता आणि एकता टिकविण्याचे आवाहन आवाहन पोलीस उपायुक्त प्रशांत खरे यांनी केले आहे.

वाहतुकीत बदल

  • कोपरखरणे येथील संगम डेअरी, स्मशनभुमी खाडी किनाऱ्यालगताचा रस्ता सेक्टर १९ ते वरिष्ठा चौक सेक्टर २० दरम्यान गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज व इतर वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
  • बेलापुर मधील आग्रोळी तलाव परिसरातील वाहनांना प्रवेशबंदी केली असून १५ गुरुवारी रात्री १२ पासून शुक्रवारी सकाळी ६ वाजेपर्यत बंदी लागू करण्यात आली आहे.
  • वाशी मध्ये शिवाजी चौक येथे गणेश विसर्जन मिरवणुकीतील वाहनांखेरीज इतर वाहनांना प्रवेश बदी केली आहे.
  • मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनास बदी आहे. दूध, पेट्रोल, स्वयंपाक गॅस सिलेंडर, लिक्वीड मेडिकल व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहनांना लागू राहणार नाही.
  • जुईनगर येथील गावदेवी चौक व माणिकराव बडोबा पाळकर चौक येथील रस्त्यावर प्रवेश बंदी घोषित केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2016 1:51 am

Web Title: tight security for ganesh idols immersion at navi mumbai
Next Stories
1 बाल्या नाचात आता महिलांचा फेर
2 फलकबाजीने शहराचे विद्रुपीकरण
3 तरुणाईच्या उत्साहाचे ढोल निनादणार
Just Now!
X