22 September 2020

News Flash

सिडकोच्या घरांसाठीची आज अंतिम यादी

सिडकोने पहिल्यांदाच महागृहनिर्मितीची योजना आखली आहे. या घरांच्या निर्मितीला सुरुवात झाली असून समांतर विक्री केली जात आहे.

(संग्रहित छायाचित्र)

सिडकोच्या खारघर, कळंबोली, तळोजा, द्रोणागिरी आणि घणसोली येथील १४ हजार ८३८ घरांची अंतिम यादी शुक्रवारी प्रसिद्ध होणार आहे. या घरांतील ५२६२ घरे ही आर्थिकदृष्टय़ा दुर्बल नागरिकांसाठी राखीव असून हीच घरे पंतप्रधान आवास योजनेतील आहेत. शिल्लक ९५७६ घरे ही अल्प उत्पन्न गटासाठी असून यासाठी १ लाख ९१ हजार ८४२ अर्ज आले आहेत. त्यांची यादी शुक्रवारी २८ सप्टेंबर रोजी संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणार असून २ ऑक्टोबर रोजी सोडत होणार नाही.

सिडकोने पहिल्यांदाच महागृहनिर्मितीची योजना आखली आहे. या घरांच्या निर्मितीला सुरुवात झाली असून समांतर विक्री केली जात आहे. १४ हजार ८३८ घरांसाठी दोन लाखांपर्यंत अर्ज आले असून त्यांची यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. या अर्जातील १४ हजार ८३८ अर्जदारांना पाच दिवसांनी घरे मिळणार आहेत. त्याची सोडत दोन ऑक्टोबरला सकाळी अकरा वाजता निघणार आहे.

संध्याकाळपर्यंत या घरांची सोडत पूर्ण होणार असून यासाठी माजी उपलोकायुक्त सुरेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. यात सिडको व म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. म्हाडाच्या सोडतीसाठी वापरण्यात येणारे सॉफ्टवेअर या सोडतीसाठी वापरण्यात येत असून प्रॉबटी ही खासगी संस्था संगणक प्रणाली राबविण्याचे काम करीत आहे.

चारच अर्ज बाद

एकूण १ लाख ९१ हजार ८४२ अर्ज आले आहेत. त्यातील केवळ चारच अर्ज बाद झालेले आहेत. या अर्जदारांनी अर्ज भरताना अर्जावरील नाव स्वत:चे तर स्वाक्षरी मात्र आई-वडिलांची केल्याचे आढळून आले आहे. त्यांना त्यांची निवेदने सादर करण्याची मुभा गुरुवापर्यंत देण्यात आली होती.

अंतिम यादी २८ सप्टेंबरला संध्याकाळपर्यंत प्रसिद्ध होणार आहे. याच यादीची सोडत दोन ऑक्टोबरला सकाळी ११ वाजता सुरू होईल. संध्याकाळपर्यंत भाग्यवंतांची नावे प्रसिद्ध होणार आहेत. यासाठी विशेष सॉफ्टवेअर तयार करण्यात आले आहे.

-लक्ष्मीकांत डावरे, पणन अधिकारी, सिडको

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 28, 2018 3:58 am

Web Title: todays final list for cidcos house
Next Stories
1 अवकाळी पावसाचा फळांना फटका
2 गावठाण सर्वेक्षण मुद्दा ऐरणीवर
3 १५ मुलींवर अत्याचार करणारा अटकेत
Just Now!
X