News Flash

टोलनाका कामगारांवर संकट

उरणमधील ३०० कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न

उरणमधील ३०० कामगारांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न
उरण, पनवेल व जेएनपीटी बंदराला जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ ब व राज्य महामार्ग क्रमांक ५४ या दोन्ही मार्गावरील टोल १ मेपासून बंद करण्यात आलेले असून त्यामुळे या टोलवर काम करणारे ३०० स्थानिक कामगार बेरोजगार झालेले आहेत. त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी कामगार संघटनेने केली आहे. त्यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयासमोर सोमवारी आंदोलन करण्यात आले. ११ मेपासून रस्ते विभागाच्या कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचाही इशारा देण्यात आला.
उरण, पनवेल व जेएनपीटीला जोडणाऱ्या महामार्गाचे सहा व आठ पदरी रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यानुसार रस्ते मंत्रालयाने या मार्गावरील दास्तान, चिर्ले तसेच करंजाडे येथील तीनही टोल नाके बंद केले आहेत. या टोलवर ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी रस्ता रुंदीकरणात संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्यातील स्थानिक कामगार काम करीत होते. हे टोलनाके बंद केल्याने या ३०० कामगारांना बेरोजगार व्हावे लागले आहे. त्यांना पर्यायी रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी इंटकचे राज्य कार्याध्यक्ष महेंद्र घरत यांनी केली आहे. त्यासाठी घरत यांच्या नेतृत्वात कामगारांनी डी पॉइंट येथील रस्ते विभागाच्या कार्यालयावर धडक देऊन आपली मागणी मांडली आहे. रस्ते विभागाचे प्रकल्पाधिकारी प्रशांत फेगडे यांना कामगारांनी निवेदन दिले. कामगारांना पर्यायी रोजगार उपलब्ध न झाल्यास आंदोलन करण्याचाही इशारा यावेळी देण्यात आला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 4, 2016 12:10 am

Web Title: toll naka workers toll naka
Next Stories
1 बेदम मारहाणीत तरुणाचा मृत्यू
2 पालिकेत दक्षता पथक नेमण्याची नवीन आयुक्तांची घोषणा
3 पालिका कर्मचाऱ्यांची झाडाझडती
Just Now!
X