25 February 2021

News Flash

शीव-पनवेल मार्गावर वाहतूक कोंडी

वाशी टोल नाक्यापासून सानपाडा पुलापर्यंत रांगा

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

हायड्रा ट्रक बंद पडल्याने वाशी टोल नाक्यापासून सानपाडा पुलापर्यंत रांगा

शीव-पनवेल मार्गावरील पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाशी पुलावर मंगळवारी सकाळी ८.३०च्या सुमारास हायड्रा ट्रक बंद पडला. त्यामुळे वाशी टोल नाक्यावरून सानपाडा पुलापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक पोलिसांनी कोंडी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, मात्र दुपारी १२च्या सुमारास हायड्रा ट्रक सुरू झाल्यांनतरच वाहतूक सुरळीत झाली.

शीव-पनवेल मार्गावरील वाशी पुलावर हायड्रा ट्रक बंद पडल्याने पनवेलकडून मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. तीन मार्गिका असणाऱ्या रस्त्यावरील केवळ दोनच मार्गिका सुरू होत्या. त्यामुळे वाशी टोल नाक्यावरून सानपाडा पुलापर्यंत चार किलोमीटर भागात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे सकाळी नवी मुंबई, पनवेलहून मुंबईकडे जाणाऱ्या नोकरदारांना वाहतूककोंडीचा फटका बसला. १० मिनिटांच्या प्रवासासाठी एक तासापेक्षा अधिक काळ लागत होता. वाहनांची रांगा पिवळ्या पट्टीच्या पुढे गेल्यानंतर टोल न घेता वाहने सोडण्याचा नियम आहे, तरीही वाशी टोल नाक्यावर टोल आकारणी सुरूच होती. त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडली. तब्बल साडे तीन तासांनतर दुपारी १२च्या सुमारास हायड्रो ट्रॅक सुरू झाल्यांनंतर वाहतूक सुरळीत झाली. वाशी वाहतूक विभागाचे पोलीस अधिकारी सतीश गायकवाड यांच्याशी संपर्क साधला असता, तो होऊ शकला नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 3, 2018 2:01 am

Web Title: traffic congestion in navi mumbai 5
Next Stories
1 ऐरोलीत महिलेची मुलासह आत्महत्या
2 पनवेल पालिकेच्या अर्थसंकल्पाची गटांगळी
3 नवी मुंबईत ४२४ तळीरामांवर कारवाई
Just Now!
X