सानपाडा, जुईनगरमध्ये वाहनतळांसाठी आरक्षित भूखंडच नाही

पार्किंगचा पेच – सानपाडा, जुईनगर

flamingo, Solar lights, Navi Mumbai ,
फ्लेमिंगो क्षेत्रात सौरदिवे! पर्यावरणवाद्यांच्या तक्रारींनंतर नवी मुंबई महापालिकेची धावाधाव
appointment of nurses in the municipal hospital was stopped due to the code of conduct
मुंबई : आचारसंहितेमुळे महानगरपालिका रुग्णालयातील परिचारिकांची नियुक्ती रखडली
Why is the demand for office spaces increasing in Pune
पुण्यात कार्यालयीन जागांना का वाढतेय मागणी? जाणून घ्या कारणे…
Bhushan Gagrani BMC commissioner
मुंबईला मिळाले नवे आयुक्त, ‘या’ अधिकाऱ्यावर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिकेची जबाबदारी

महापालिका क्षेत्रातील जुईनगर सानपाडा विभागात पार्किंगची समस्या जटिल झाली आहे. या विभागात पार्किंगसाठी एकही भूखंड आरक्षित ठेवण्यात आलेला नाही. आधीच अरुंद रस्ते आणि त्यात भर म्हणजे दुतर्फा पार्किंग यामुळे वाहतुकीत अडथळे येत आहेत.

जुईनगर सेक्टर २४ पासून चिंचोळी तालवापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची लांबलचक रांग लागलेली असते. जुईनगरमध्ये सिडको वसाहती जास्त आहेत. त्यांची संख्या ४०च्या घरात आहे, मात्र या वसाहतीत सोसायटीच्या आवारात वाहने पार्क करण्याची सोय नाही. त्यामुळे या सर्व सोसायटय़ांतील रहिवासी आपापली वाहने रस्त्यावरच पार्क करतात. जुईनगरमधील सेक्टर २१ ते २४ हा परिसर कायम वाहतूककोंडीने ग्रासलेला असतो. रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनांच्या रांगा या रेल्वे स्थानकापासूनच सुरू होतात. हा नेरुळमध्ये प्रवेश करण्यासाठी मुख्य रस्ता आहे . त्यामुळे येथून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या नेहमीच मोठी असते. नो पार्किंग झोन, बस थांब्यांच्या समोरही वाहने पार्क केली जातात.

वाढत्या वाहनसंख्येबरोबर पार्किंगची समस्या अधिकाधिक बिकट होऊ लागली आहे. ज्या रस्त्यांवर पूर्वी एका बाजूला वाहने पार्क केली जात तिथे आता दोन्ही बाजूंना पार्किंग सुरू झाले आहे आणि तेही अपुरे पडत आहे. पार्किंगसाठी जागा शोधत फिरणारी वाहने कोंडीत अधिकच भर घालतात.

सानपाडा व जुईनगर परिसरातील रस्ते अरुंद असून त्यांच्या रुंदीकरणास फारसा वावही नाही. शहराच्या या भागात व्यवसायाला पूरक व पोषक सोयीसुविधा असल्यामुळे तेथील निवासीक्षेत्रांचे रूपांतर व्यवसाय क्षेत्रांत होऊ लागले आहे. परिणामी वाहनांची गर्दीही वाढत आहे, मात्र पार्किंगसाठी भूखंड उपलब्धच नसल्यामुळे प्रश्न अनुत्तरितच राहिला आहे.

सानपाडय़ाच्या गल्ल्यांतही पार्किंग

सानपाडा गावातील चिंचोळ्या गल्ल्यांमध्येही वाहने पार्क केली जात आहेत. काही ठिकाणी वाहनांच्या एकाहून अधिक रांगा लावल्या जात आहेत. त्यामुळे निम्मा रस्ता पार्किंगसाठी व्यापला जाऊन त्याला पार्किंग भूखंडाचे स्वरूप येत आहे. सानपाडय़ातून जुईनगरमध्ये जाण्यासाठीच्या रस्त्यावरही हीच स्थिती आहे. जुईनगर आणि सानपाडय़ातील रस्ते जोडलेले आहेत. त्यामुळे वर्दळ जास्त असते. अरुंद रस्त्यांमुळे वाहने दुभाजकावर धडकून अपघात घडले आहेत.

पूनम धनावडे,