दरोडेखोरांनी हातपाय बांधून लाखो रुपयांच्या मालासह ट्रक पळवल्याची खोटी तक्रार देणाऱ्या ट्रकचालक आणि क्लीनरचा बनाव डायघर पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या प्रकरणी ट्रकचालकासह आठ जणांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून सुमारे १६ लाखांचा ऐवज जप्त केला आहे.
नवी मुंबई येथील कळंबोली भागात राहणारे देवाराम बिष्णोई यांचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय असून त्यासाठी त्यांनी एक ट्रक भाडय़ाने घेतला होता. या ट्रकवर रामदयाल चौधरी हा चालकाचे आणि मोहम्मद रफिक हा क्लीनरचे काम करीत होता. उत्तरशीव येथे चार ते पाच जणांनी ट्रक अडवून आमचे हातपाय, तोंड बांधले आणि मालासह ट्रक पळवला, अशी तक्रार रामदयाल आणि रफिक यांनी डायघर पोलीस ठाण्यात दिली होती.