समाजमाध्यमांवर मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी एकजूट झालेल्या नागरिकांत संघटन कौशल्य नसल्यामुळे समर्थकांची मुख्यालयाबाहेरील संख्या अगदीच तुरळ होती. त्याऐवजी विरोधकांना राजकीय नेत्यांनी गाडय़ा भरून आणल्याचे चित्र होते. शेकडोंच्या संख्येने गर्दी केली होती.

यात फेरीवाले, व्यापारी आणि प्रकल्पग्रस्त मोठय़ा संख्येने विरोध दर्शविण्यासाठी मुख्यालयाबाहेर उभे होते. मुंढेंना पाठिंबा देण्यासाठी आलेल्या लक्ष्मी यादव म्हणाल्या, की नवी मुंबईत प्रस्थापित राजकारण्यांना नेत्यांचा वरदहस्त आहे. त्यांचा सामना करण्यासाठी  मुंढेंनी सुरुवात केली. त्यांच्या प्रयत्नाने  पदपथ मोकळे झाले. सोलापुरमध्येही त्यांच्या अशा कामाने आम्ही प्रभावित झालो होतो. त्यांच्या कामाची ही अशी पद्धत आहे.  कडकोट पोलिस बंदोबस्त असल्यामुळे परिसराला पोलिस छावणीचे स्वरुप आले होते.

मुंडेंना पाठिंबा देण्यासाठी समाज माध्यमावर एकजूट झालेल्या नागरिकांनी स्वाक्षरी मोहिम सुरू केली. या वेळी मुंढे यांचा पालिकेत पराभव झाला असला तरी ते या शहरात विजयी झाले आहेत. नागरिकांच्या हृदयात त्यांचे स्थान अढळ असल्याचे एका समर्थकाने सांगितले.