नागरिक, घरातून काम करणाऱ्यांची गैरसोय

Big updated for admissions under RTE Online application registration will start
आरटीईअंतर्गत प्रवेशांसाठी मोठी अपटेड… ऑनलाइन अर्ज नोंदणी होणार सुरू…
easy trip planners limited, company share, stock market, share market, portfolio, share market portfolio, stock market portfolio, easemytrip, trip planning company, holiday planning company, holiday packages, trip planning service, airline ticket service, finance article,
माझा पोर्टफोलियो : प्रवास सोपा नाही म्हणून!
indigrid cio meghana pandit talks about future Investment flow in invit
‘इन्व्हिट्स’मध्ये गुंतवणूक ओघ वाढत जाणार ! इंडिया ग्रिड ट्रस्टच्या मुख्य गुंतवणूक अधिकारी पंडित यांचे प्रतिपादन  
Kia adds two new automatic variants
बाकी कंपन्यांचे धाबे दणाणले, Kia ने सर्वाधिक विक्री होणाऱ्या कारचे आणले २ नवे व्हेरिएंट, किंमत…

नवी मुंबई : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात टाळेबंदी जाीहर झाली आहे. या कालावधीत नागरिकांना घरात मनोरंजनाचे टिव्ही हे एकमेव साधन आहे. तसेच वर्क फॉर्म होम करणाऱ्यांना इंटरनेट सेवा मिळणे गरजेचे आहे. त्यामुळे हे काम करणाऱ्यांना अत्यावश्यक सेवेत समाविष्ठ करावे अशी मागणी होत आहे.

देशात २१ दिवस टाळेबंदी जाीहर झाली आहे. आज टाळेबंदीचा तिसरा दिवस आहे. या काळात नागरिकांनी घरातून बाहेर पडायचे नाही, असे आदेश आहेत. त्यामुळे नागरिकांना घरातच मनोरंजन हवे असेल तर टिव्ही हे एकमेव साधन आहे. तसेच वर्क फार्म होम असणाऱ्यांना घरात इंटरनेट सेवा मिळणे गरजेचे आहे. बंदी असल्याने अनेकांची गैरसोय होत आहे. दुरुस्तसाठी किंवा नवीन जोडणीसाठी त्या कंपनीचे तंत्रज्ञ येऊ शकत नाहीत. कारण रस्त्यात पोलिसांनी अडवले तर काय असा त्यांचा प्रश्न आहे, त्यामुळे ही सेवा अत्यावश््यक सेवेत असावी अशी मागणी होत आहे.

पोलिसांनी तंत्रज्ञ लोकांना ओळखपत्र असताना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आल्याची माहिती डेन केबलचे संचालक संजीव गुप्ता यांनी दिली. या बाबत नवी मुंबई पोलिसांनीही सकारात्मक दृष्टिकोन ठेवला असल्याचेही गुप्ता यांनी सांगितले तर या विषयी  परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले की, या बाबत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल.