बेकरीत कामाला लावतो, असे सांगून आसाम येथून एका तरुणीला पनवेलमधील खिडूकपाडा गावात तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आणि नंतर तिला ४० हजारांच्या मोबदल्यात वेश्या व्यवसायात ढकलणाऱ्या चौघांपैकी दोन तरुणांना पोलिसांनी अटक केली. पीडित तरुणीची दखल चेंबूर येथील एका सामाजिक संघटनेने घेतल्यानंतर हे प्रकरण पोलिसांत दाखल झाले. नवी मुंबई आणि मुंबई पोलिसांनी मिळून ही कारवाई केली. मुंबईत वेश्या व्यवसायासाठी मुली पुरविणाऱ्या महिलेच्या घरात पीडित तरुणीला ठेवण्यात आले होते. हकब नूर महम्मद शेख, मुजूमुल्लमा अवदत मुल्ला अशी अटकेतील तरुणांची नावे आहेत.