News Flash

उद्धव ठाकरे पंतप्रधान होणार का?; आठवले म्हणाले…

सध्याच्या परिस्थितीप्रमाणं उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले पण पंतप्रधान होणं सोप नाही.

संग्रहित छायाचित्र

पंतप्रधान म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहिलं जात असल्याचा उल्लेख सामना या वृत्तपत्रातून करण्यात आला आहे. यावर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यानुसार, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान होऊ शकत नाहीत, असं मत आठवले यांनी व्यक्त केलं आहे.

नवी मुंबई विमानतळाच्या कामात येथील पुरातन लेणी उद्धवस्त केली जात असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांकडून केल्या जात असल्याने आठवले यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

आठवले म्हणाले, “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झालेलेच आहेत, मात्र पतंप्रधान होणं इतकं सोप काम नाही. पंतप्रधान होण्यासाठी संपूर्ण देशभर तुमचा पक्ष असला पाहिजे. महाराष्ट्रातील संख्याबळाच्या जोरावर ही बाब अशक्य आहे. केवळ इच्छा असूनही उपयोग नाही त्यासाठी आपली तेवढी राजकीय ताकद असली पाहिजे. त्यानुसार उद्धव ठाकरे यांची ताकद पंतप्रधान होण्याइतपत आजिबात नाही. कारण शिवसेना महाराष्ट्राच्या बाहेर ताकद वाढवू शकत नाही. त्यामुळे त्यांची जरी इच्छा असली तरी त्याचं पंतप्रधान होणं ही बाब माझ्या दृष्टीकोनातून अशक्य आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2020 3:00 pm

Web Title: uddhav thackeray can not become pm says ramdas athwale aau 85
Next Stories
1 नवी मुंबईत आज ३८८ नवे करोनाबाधित, १० जणांचा मृृत्यू 
2 नवी मुंबईत आज ३२३ नवे रुग्ण, करोनाबाधितांची एकूण संख्या १३ हजारांच्या पुढे
3 नवी मुंबईत ३०८ नव्या करोनाबाधितांची नोंद; आतापर्यंत ३७० जणांचा मृत्यू  
Just Now!
X