14 October 2019

News Flash

वाशी रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा फेरीवाले

पालिकेची गाडी जाताच फेरीवाले पुन्हा बसत आहेत.

वाशी रेल्वे स्थानकाबाहेरील पदपथावर फेरीवाल्यांनी पुन्हा आपली बेकायदा ‘दुकानं’ सुरू केली आहेत. या ठिकाणी दररोज कारवाई करून दंड वसूल केला जातो, तरीदेखील पालिकेची गाडी जाताच फेरीवाले पुन्हा बसत आहेत.

वाशी रेल्वे स्थानक हे नवी मुंबई शहराचे महत्त्वाचे ठिकाण आहे. या परिसरात सायंकाळी फेरीवाले मिळेल त्या ठिकाणी आपले दुकान मांडून बसतात. यामध्ये पाणीपुरीवाला,चहावाला, फळवाले असतात. सायंकाळच्या वेळी नोकरदार वर्ग घरी परतत असताना वर्दळीच्या ठिकाणी फेरीवाले बसत असल्याने अडचण होत आहे. तात्पुरत्या कारवाईने काही वेळापुरते पदपथ मोकळे असतात, मात्र कारवाईची पाठ फिरताच पुन्हा दुकाने थाटतात. अनेक दुकानधारक वाढीव जागेचा देखील वापर करीत आहेत.

वाशी स्थानकाबाहेर मोकळ्या जागेत अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांवर दररोज  कारवाई केली जाते. या कारवाईदरम्यान त्यांचा मालही जप्त केला जातो. त्यांच्याकडून दोन ते २५ हजारापर्यंत दंड वसूल केला जातो.    – दिवाकर एन. समेळ, साहाय्यक आयुक्त, वाशी

First Published on May 9, 2019 10:14 am

Web Title: unauthorized hawkers in navi mumbai 4