25 April 2019

News Flash

बेशिस्त चालकांना दंडाऐवजी राखी

पनवेल शहर वाहतूक पोलीस, पनवेल शहर पोलीस ठाणे आणि पत्रकार मित्र असोसिएशनने हा उपक्रम राबवला.

(संग्रहित छायाचित्र)

पनवेलमधील नानासाहेब धर्माधिकारी उड्डाणपुलाखाली सिग्नलजवळ रविवारी अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन साजरे करण्यात आले. वाहतूक पोलीस रजनी पाळंदे यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांना दंड आकारण्याऐवजी त्यांच्या हाती राखी बांधून रक्षाबंधनाचा सण साजरा करण्यात आला.

पनवेल शहर वाहतूक पोलीस, पनवेल शहर पोलीस ठाणे आणि पत्रकार मित्र असोसिएशनने हा उपक्रम राबवला.

बेशिस्त चालकांवर लक्ष ठेवण्यासाठी पनवेल शहरातील प्रत्येक मोक्याच्या ठिकाणी अधिकाऱ्यांसह महिला पोलीस तैनात करण्यात आल्या होत्या. रविवारी नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना दंड ठोठावण्याऐवजी वाहतुकीचे नियम समजावून सांगण्यात आले.

First Published on August 28, 2018 3:21 am

Web Title: unconscious drivers instead of penalties